North Maharashtra Nagar Parishad Election Result 2025: उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, या निवडणुकांमध्ये महायुतीने वर्चस्व सिद्ध केले आहे. विशेषतः नाशिक जिल्ह्यात शिंदे शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला असून, नाशिकमध्ये महाविकास आघाडीला एकाही ठिकाणी नगराध्यक्षपद जिंकता आलेले नाही.

Continues below advertisement

नाशिक जिल्हा : 11 नगरपरिषदा – महायुतीचा क्लीन स्वीप

पक्षनिहाय निकाल

महायुती

Continues below advertisement

* भाजप – 3* राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 3* शिवसेना (शिंदे गट) – 5

महाविकास आघाडी

* ठाकरे शिवसेना – ०* राष्ट्रवादी (शरद पवार गट) – ०* काँग्रेस – ०

नगरपरिषदनिहाय विजयी उमेदवार

1. भगूर – राष्ट्रवादी (अजित पवार) : प्रेरणा बलकवडे2. पिंपळगाव बसवंत – भाजप : डॉ. मनोज बर्डे3. सिन्नर – राष्ट्रवादी (अजित पवार) : विट्ठलराजे उगले (माणिकराव कोकाटे यांनी गड राखला)4. ओझर – भाजप : अनिता घेगडमल5. त्र्यंबकेश्वर – शिवसेना (शिंदे) : त्रिवेणी तुंगार6. इगतपुरी – शिवसेना (शिंदे) : शालिनी खताळे7. येवला – राष्ट्रवादी (अजित पवार) : राजेंद्र लोणारी (भुजबळ समर्थक; भुजबळांचा गड कायम)8. मनमाड – शिवसेना (शिंदे) : बबलू पाटील9. नांदगाव – शिवसेना (शिंदे) : सागर हिरे10. सटाणा – शिवसेना (शिंदे) : हर्षदा पाटील11. चांदवड – भाजप : वैभव बागुल

नाशिक जिल्ह्यात 11 पैकी 5 नगराध्यक्षपदे शिंदे शिवसेनेकडे, तर भाजप व अजित पवार गटाला प्रत्येकी 3-3 जागा मिळाल्या.

जळगाव जिल्हा निकाल

मुक्ताईनगर

* नगराध्यक्ष : शिवसेना (शिंदे)* नगरसेवक : शिवसेना 11, भाजप 4, अपक्ष 2

धरणगाव

* नगराध्यक्ष : लीलाबाई चौधरी (ठाकरे गट, महाविकास आघाडी)* नगरसेवक : महायुती 15, महाविकास आघाडी 8

सावदा

* नगराध्यक्ष : रेणुका पाटील (भाजप–शिंदे महायुती)* नगरसेवक : भाजप 5, राष्ट्रवादी (अजित) 7, शिवसेना (शिंदे) 5, अपक्ष 3

फैजपूर

* नगराध्यक्ष : दामिनी सराफ (भाजप)* नगरसेवक : भाजप 9, काँग्रेस 5, राष्ट्रवादी (अजित) 3, अपक्ष 3, एमआयएम 1

भडगाव

* नगराध्यक्ष : रेखा मालाचे (शिवसेना शिंदे)* नगरसेवक : शिवसेना (शिंदे) 19, भाजप 4, इतर 1

जामनेर

* नगराध्यक्ष : साधना महाजन (भाजप – बिनविरोध)* नगरसेवक : भाजप 22, राष्ट्रवादी (शरद) 4

वरणगाव

* नगराध्यक्ष : सुनील काळे (अपक्ष)* नगरसेवक : भाजप 14, शिवसेना (शिंदे) 5, राष्ट्रवादी (शरद) 2

नंदुरबार जिल्हा

एकूण जागा 04

शिवसेना शिंदे गट 01राष्ट्रवादी अजित पवार गट 02जनता विकास आघाडी 01

नंदुरबार:- रत्ना चंद्रकांत रघुवंशी शिवसेना शिंदे गट

शहादा:- अभिजीत पाटील जनता विकास आघाडी

तळोदा:- भाग्यश्री चौधरी राष्ट्रवादी अजित पवार गट

नवापूर:- जयवंत जाधव राष्ट्रवादी अजित पवार गट

नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपाला जोरदार झटका लागला असून चार पैकी एकही नगरपालिका भाजपाला जिंकता आलेली नाही

धुळे जिल्हा

शिंदखेडा

* नगराध्यक्ष : कलावती माळी (राष्ट्रवादी अजित पवार)* नगरसेवक : भाजप 11, राष्ट्रवादी (अजित पवार) 4, काँग्रेस 1, राष्ट्रवादी (शरद पवार) 1

पिंपळनेर

* नगराध्यक्ष : योगिता चौरे (भाजप)* नगरसेवक : भाजप 8, शिवसेना 8, अपक्ष 2

अहिल्यानगर जिल्हा, 

1) राहाता नगरपालिकेवर विखे पाटलांचा झेंडा...

विखे पाटलांनी गड राखला...भाजपचे _ स्वाधीन गाडेकर_ बहुमताने विजयी..20 पैकी 19 जागेवर भाजप सेनेचा विजय...विरोधकांना मिळाली अवघी एक जागा...

2) देवळाली प्रवरा नगरपालिका...

माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी सत्ता राखली..भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार _ सत्यजित कदम _ विजयी..जनतेने दुसर्‍यांदा दिली नगराध्यक्ष पदाची संधी...14 जागेवर भाजपचे नगरसेवक विजयी...काॅग्रेसचा चार जागांवर विजय...

3) नेवासा नगरपालिका...

माजी आमदार शंकरराव गडाख यांचा गड आला पण सिंह गेला..17 पैकी 10 जागेवर गडाखांचे उमेदवार विजयी..मात्र नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय..6 जागेवर महायुतीचे उमेदवार विजयी..1 जागेवर आम आदमी पार्टीचा विजय...

4) राहुरी नगरपालिकेवर तनपूरेंची सत्ता...

माजी आमदार प्राजक्त तनपूरे यांच्या शहर विकास आघाडीचा विजय...नगराध्यक्षपदी बाबासाहेब मोरे  बहुमताने विजयी..तनपूरेंनी आपला गड राखला...24 पैकी 17 जागेवर तनपूरेंचे उमेदवार विजयी...7 जागेवर भाजपच्या नगरसेवकांचा विजय...

5) संगमनेर नगरपालिका..

बाळासाहेब थोरातांनी आपला गड राखला...संगमनेर सेवा समीतीच्या  नगराध्यक्ष उमेदवार मैथीली तांबे सोळा हजार चारशे मतांनी विजयी..शिवसेना भाजप युतीच्या सुवर्णा खताळ पराभूत..विरोधकांना मिळाली केवळ एकच जागा... 30 पैकी 27 जागेवर संगमनेर सेवा समितीचा विजयथोरात तांबे यांचं नगरपालिकेवर निर्विवाद वर्कस्व....संगमनेर सेवा समितीचे 27 नगरसेवक विजयी.. .एक शिवसेना नगरसेवक विजयी तर दोन अपक्ष विजयी...

6) कोपरगाव नगरपालिका

भाजपाचे पराग संधान नगराध्यक्ष पदी विजयीराष्ट्रवादी AP गटाच्या उमेदवाराचा अवघ्या 399 मतांनी पराभव...अटीतटीच्या लढतीत भाजपाचा विजय...काळे कोल्हे संघर्ष असलेली निवडणूक...एकूण जागा 30भाजपचे 19 तर राष्ट्रवादीचे 11 नगरसेवक विजयी...

7) शिर्डी नगरपरिषद

शिर्डीत भाजपच्या जयश्री विष्णू थोरात यांचा दणदणीत विजय...शिर्डी पालिका भाजपच्या ताब्यात...23 जागांपैकी भाजपचे 15, शिंदे शिवसेना 3, अजित पवारांची राष्ट्रवादीचे 2 नगरसेवक विजयी.. तर 3 जागांवर अपक्षांची बाजी...शिर्डी भाजपच्या जयश्री थोरात नगराध्यक्षपदी...

8) श्रीरामपूर नगरपरिषद निवडणूक

नगराध्यक्षपदी काँग्रेसचे करण ससाणे विजयी...34 नगरसेवकांपैकी20 काँग्रेस10 भाजप युती 3 शिवसेना शिंदे  अपक्ष एक श्रीरामपूर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडा साफ....माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांचा मोठा पराभव..

आणखी वाचा 

Nandgaon Nagarparishad Election Result 2025: मोठी बातमी: सुहास कांदेंनी नांदगावचा गड राखला, शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी; राष्ट्रवादीचा धुव्वा, भुज'बळ' कमी पडले!