North Maharashtra Mayor Reservation: राज्यातील 29 महानगरपालिकांमधील महापौरपदासाठी आज आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत पार पडली. 50 टक्के महिला आरक्षणाचा नियम लागू झाल्याने यंदा राज्यातील तब्बल 15 महापालिकांमध्ये महिला महापौर होणार असून, उर्वरित 14 महापालिकांमध्ये सर्वसाधारण प्रवर्गाला संधी मिळाली आहे.
महिलांसाठी लागू असलेल्या 50 टक्के आरक्षणानुसार 4 महापालिकांमध्ये ओबीसी महिला, तर 9 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव राहणार आहे. 15 जानेवारी रोजी झालेल्या मतदानानंतर 16 जानेवारीला मतमोजणी पार पडली होती. त्यानंतर आता महापौरपदाच्या आरक्षणामुळे स्थानिक राजकारणात हालचालींना वेग आला आहे.
Maharashtra Mayor Reservation: महाराष्ट्रातील 29 महापौरपदांचे आरक्षण
अनुसूचित जमाती – 1
अनुसूचित जाती – 3
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) – 8
सर्वसाधारण – 17
North Maharashtra Mayor Reservation: उत्तर महाराष्ट्रात कोणत्या प्रवर्गाला संधी?
उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पाच महानगरपालिकांमध्ये पुढीलप्रमाणे आरक्षण लागू झाले आहे.
जळगाव – ओबीसी महिला
अहिल्यानगर – ओबीसी महिला
नाशिक – सर्वसाधारण महिला
धुळे – सर्वसाधारण महिला
मालेगाव – सर्वसाधारण महिला
Nashik Mayor Reservation: नाशिक महापालिका : सर्वसाधारण महिला
नाशिक महापालिकेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपकडे 72 नगरसेवक आहेत. त्यामुळे महापौरपदावर भाजपचीच वर्णी लागणार असल्याचे दिसून येत आहे. महापौरपदासाठी भाजपमधील अनेक दिग्गज महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत.
प्रमुख दावेदार
- चंद्रकला धुमाळ
- रोहिणी पिंगळे
- हिमगौरी आडके
- स्वाती भामरे
- माधुरी बोलकर
- संध्या अभिजीत कुलकर्णी
- प्रतिभा बाळासाहेब पवार
- डॉ. योगिता अपूर्व हिरे
- डॉ. दिपाली सचिन कुलकर्णी
Jalgaon Mayor Reservation: जळगाव महापालिका : ओबीसी महिला
जळगाव महापालिकेत ओबीसी महिला आरक्षण जाहीर होताच भाजपमधील महिला नगरसेविकांची नावे चर्चेत आली आहेत. विशेष म्हणजे प्रमुख दावेदारांमध्ये सर्वच भाजपच्या नगरसेविका आहेत.
प्रमुख नावे
दीपमाला काळे
उज्वला बेंडाळे (तीन वेळा विजयी, माजी महापौर, बिनविरोध निवड) – प्रबळ दावेदार
मात्र भाजपकडून ‘धक्का तंत्र’ वापरले गेल्यास विद्या मुकुंद सोनवणे, माधुरी बारी यांनाही संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Dhule Mayor Reservation: धुळे महापालिका : सर्वसाधारण महिला
धुळे महापालिकेत सर्वसाधारण महिला आरक्षण लागू झाल्याने अनुभवी महिला नेत्यांमध्ये चुरस वाढली आहे.
संभाव्य नावे
जयश्री अहिरराव (माजी महापौर)
निशा महाजन
मायादेवी परदेशी
कल्पना महाले (माजी महापौर)
कल्याणी अंपळकर (माजी उपमहापौर)
Ahilyanagar Mayor Reservation: अहिल्यानगर महापालिका : ओबीसी महिला
अहिल्यानगरमध्ये ओबीसी महिला आरक्षण निघाल्याने भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.
प्रमुख दावेदार
शारदा ढवण – भाजप
पुष्पा बोरुडे – भाजप
आशाबाई कातोरे – भाजप
सुजाता पडोळे – राष्ट्रवादी
वर्षा काकडे – राष्ट्रवादी
अश्विनी लोंढे – राष्ट्रवादी
Malegaon Mayor Reservation: मालेगाव महापालिका इस्लाम पार्टीमध्ये चुरस
मालेगाव महापालिकेत महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर इस्लाम पार्टीकडून महापौर पदासाठी हालचालींना वेग आला आहे. इस्लाम पार्टीच्या नगरसेविका नसरीन खालिद शेख या महापौर पदासाठी प्रमुख दावेदार मानल्या जात असून, त्यांच्यासोबत माजी महापौर ताहेरा शेख या देखील महापौर पदाच्या शर्यतीत आहेत.
आणखी वाचा
