North Maharashtra Election Result Live 2026: नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात कोणाची सत्ता? वाचा विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर...
North Maharashtra Election Result Live 2026 : नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगरसह मालेगाव महापालिकेत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पार्श्वभूमी
North Maharashtra Election Result Live 2026 : राज्यातील 29 महानगरपालिकासाठी गुरुवारी दि 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगरसह मालेगाव महापालिकेत अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली...More
मालेगाव महापालिका निवडणुकीतील पूर्व भागात मालेगाव सेक्युलर फ्रंट मधील ' इस्लाम ' पार्टीने 35 व समाजवादी पार्टीने 6 जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. तर पश्चिम भागात शिवसेनेने ( शिंदे गट ) 18 जागा मिळवत आपला करिष्मा कायम ठेवला..माजी आमदार आसिफ शेख यांनी प्रथमच महापालिका निवडणुकीत लढलेल्या इस्लाम पक्षाचा मालेगावात महापौर बसवण्याचा मार्ग मोकळा झाला..समाजवादी पार्टी व शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाचा पाठिंबा घेत सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे..या निवडणुकीत एमआयएम पक्षाला 20, काँग्रेसला 3 तर भाजपला 2 जागा मिळाल्या. महापालिकेतील माजी गटनेते सुनील गायकवाड, भाजपचे महानगर प्रमुख देवा पाटील यांना पराभव पत्करावा लागला. इस्लामच्या माजी महापौर ताहेरा शेख, शिंदे गटाचे माजी उपमहापौर नीलेश आहेर व नरेंद्र सोनवणे हे विजयी झाले आहेत..एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक यांना मात्र या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले.काँग्रेसचे महानगर प्रमुख एजाज बेग हे विजय झाले आहेत. शिवसेना ( ठाकरे गट ) राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) वंचित आघाडी,आप, बसपा या पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही..महापालिकेच्या एकूण ८४ जागांपैकी इस्लाम पक्षाची एक जागा बिनविरोध झाली होती..