Nitin Deshmukh on Eknath Shinde : महानगरपालिका निवडणुकीच्या (Mahanagarpalika election) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहे. अकोला जिल्ह्यात देखील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे यांचा सैतान असा उल्लेख केला आहे.  नितीन देशमुख यांच्या या वक्तव्यामुळं आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. 

Continues below advertisement

एकनाथ शिंदे हे भगव्याच्या आड लपलेला सैतान 

अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख 'सैतान' असा केला आहे. अकोला महापालिकेच्या ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते उमरीतील प्रचारसभेत बोलत होते. एकनाथ शिंदे हे भगव्याच्या आड लपलेला सैतान असल्याचं देशमुख म्हणाले. त्यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख गद्दार आणि सैतान असा केला आहे. त्यांच्या पक्षाचं आयुष्य हे कोंबडीच्या आयुष्याएवढं असल्याचंही देशमुखांनी म्हटलंय. ज्या दिवशी भाजप त्यांना कापून खाईन त्या दिवशी त्यांचं आयुष्य संपणार असल्याचंही ते म्हणालेत. शिंदेंची शिवसेना ही हिंदुत्वाची मतं खाण्यासाठी भाजपने उभी केलेली पार्टी असल्याचा घणाघात त्यांनी केलाय. 

अकोला महानगरपालिकेचा इतिहास

अकोला महानगरपालिकेचा इतिहास म्हणजे अकोला शहराच्या प्रशासकीय उत्क्रांतीचा भाग आहे, जिथे ब्रिटिश काळात 1888 च्या कायद्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना झाली, त्यानंतर अकोला जिल्हा निजाम राजवटीतून ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यावर (1853) प्रशासकीय रचना हळूहळू विकसित झाली आणि आता अकोला महानगरपालिका (Akola Municipal Corporation) ही शहराची मुख्य नागरी संस्था म्हणून कार्य करते, जी महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांच्या माध्यमातून शहराचा विकास आणि प्रशासन पाहते. अकोला महानगरपालिकेचा इतिहास हा ब्रिटिश काळातील प्रशासकीय बदलांमधून विकसित झाला आहे, जिथे शहराच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी नागरी प्रशासनाची स्थापना झाली आणि आज ती अकोला शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी कार्यरत आहे. या महापालिकेतील सत्तेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असते. अकोला महापालिकेत एकूण 20 प्रभागातून 80 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. महापालिकेत एकूण 5 लाख 50 हजार 60 मतदार आहेत. यात सुमारे सव्वा दोन लाख पुरुष तर अडीच लाख महिला मतदार आहेत. 

Continues below advertisement

अकोला महापालिकेतील पक्षीय बलाबल (Party-wise strength in Akola Municipal Corporation) -

एकूण जागा : 80भाजप : 48काँग्रेस : 13शिवसेना : 08राष्ट्रवादी : 05वंचित बहूजन आघाडी : 03एमआयएम : 01अपक्ष : 02