Nitin Deshmukh join BJP :  राज्यात महापालिका निवडणुकींच्या (Maharashtra Municipal Corporation Election 2026) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. आजपासून निवडणुकीला खरी सुरुवात झाली आहे. कारण आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. आजच्या दिवशी अनेक उमेदवारांनी बंडखोरी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षातील उमेदवारांनी बंडाचं निशाण उगारलं आहे. अशातच अनेकजण सत्ताधारी पक्षात प्रवेश करताना दिसत आहे. अशातच आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. 

Continues below advertisement

 मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत रात्री नितीन देशमुख यांचा पक्षप्रवेश होणार

आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांचा आज भाजप मधे पक्षप्रवेश होणार आहे. भाजपचे नेते आणि मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत रात्री नितीन देशमुख यांचा पक्षप्रवेश होणार आहे. महापालिका निवडणुकीत नितीन देशमुख यांना पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आले होते. त्यानंतर ते नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे ठरवले आहे. नितीन देशमुख यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आणखीन एक झटका बसला आहे. 

कोण आहेत नितीन देशमुख?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नितीन देशमुख हे निष्ठावान कार्यकर्ते मानले जात होते. जितेंद्र आव्हाड यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते. घाटकोपरमधील स्थानिक राजकारणातही त्यांचा प्रभाव आहे. युवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील ते सक्रीय होते. प्रवक्तेपदाची जबाबदारी देखील त्यांच्याकडे होती. राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. आक्रमक भाषेसाठी आणि जशाच्या तसे उत्तर देण्यासाठी देखील देशमुख प्रसिद्ध आहेत.

Continues below advertisement

विधानभवनाच्या लॉबीत आमदार गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांकडून नितीन देशमुखांना झाली होती मारहाण

विधानभवनाच्या लॉबीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांना मारहाण झाली होती. याप्रकरणी याप्रकरणी सर्जेराव बबन टकले (37) आणि नितीन हिंदुराव देशमुख (41) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली होती. त्यानंतर प्रत्येकी 25 हजार रुपयांच्या जातमूचलक्यावर दोघांची सुटका करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

पडळकरांच्या कार्यकर्त्यांना भिडले, पक्षाची बाजू भक्कम मांडली पण तिकीट मिळालं नाही, जितेंद्र आव्हाडांचा निष्ठावान कार्यकर्ता अजित पवारांच्या गळाला