Ajit Pawar & Sharad Pawar: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या (Municipal Election 2026) पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवडनंतर (Pimpri Chinchwad) आता मुंबईतही (Mumbai) राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र निवडणूक लढवणार का, याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महायुतीत (Mahayuti) मुंबईत राष्ट्रवादीला अपेक्षित जागा मिळणार नसल्याचे संकेत असून, शिवसेना आणि भाजपकडूनही राष्ट्रवादीला सामावून घेण्याबाबत फारसा उत्साह नसल्याचे चित्र आहे.

Continues below advertisement

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला मुंबईत एकत्र निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव देण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बुधवारी मुंबईतील पक्ष कार्यालयात राष्ट्रवादीच्या मुंबई प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर अजित पवार यांनी हे निर्देश दिल्याचे समजते.

Ajit Pawar & Sharad Pawar: पुणे–पिंपरी चिंचवडनंतर मुंबईत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र?

जर हा प्रस्ताव प्रत्यक्षात आला, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड पाठोपाठ मुंबईतही दोन राष्ट्रवादी पक्ष एकत्र निवडणूक लढवताना दिसू शकतात. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि मनसेसोबत आघाडी करून निवडणूक लढवण्यास अधिक इच्छुक असल्याची माहिती आहे. त्यामुळे मुंबईतील चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Continues below advertisement

NCP Sharad Pawar Faction: शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत जाण्यास इच्छुक

दरम्यान, मुंबईत एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाकरे बंधूसोबत जाण्यास इच्छुक आहे तर दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यासाठी इच्छुक आहे.  अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईत सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बुधवारी मुंबई प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना अजित पवारांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोबत येण्याबाबतचा प्रस्ताव देण्याचे निर्देश दिले आहेत.  तर नवाब मलिक यांच्या प्रकरणामुळे शिवसेना आणि भाजप माघार घेण्याची शक्यता नसल्याने आणि मुंबईतील अल्पसंख्यांक मते आपल्याकडे राखण्यासाठी नवाब मलिक महत्त्वाचे असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अन्य पर्यायांची चाचपणी सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने सह्याद्री अतिथीगृह येथे सुरू असलेल्या बैठकीत राष्ट्रवादीकडून विविध पर्यायांची चाचपणी सुरू आहे. आता या बैठकीत नेमका काय निर्णय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Ravindra Dhangekar: शिंदे गटाचा पुण्यातील प्रमुख चेहरा, तरीही रवींद्र धंगेकरांना बैठकीला बोलावलं नाही, मुरलीधर मोहोळांशी पंगा घेणं भोवलं