Navneet Rana :  ज्यांनी माझ्या विरोधात काम केलं ते चेहरे आठवणीत ठेवा. जे खुल्या मंचावर सांगत होते यावेळी 400 पार होणार. आमच्यातच काही घात करणारे लोकं होते. ते चेहरे लक्षात असुद्या असं वक्तव्य भाजप नेत्या नवनीत राणा यांनी केलं. लोकसभेत कोणाचे नुकसान झालं आमच्या मुलांचं झालं. माझं पराभव म्हणजे शहराचा पराभव असेही त्या म्हणाल्या.  ज्यांनी बेईमानी केली त्यांचा बदला घेणार नाही तोपर्यंत नवनीत राणा शांत बसणारी नाही

शहराच्या प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे मी लावणार आहे. भाजपाचा जेव्हा महापौर होईल तेव्हा सगळ्यात आधी मी शहरात सीसीटीव्ही लावणार आणि स्पीड ब्रेकर लावून देणार असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या. मी फक्त पाच वर्षे खासदार होते तेव्हा मी अमरावतीसाठी मेडिकल कॉलेज आणि पायलट ट्रेनिंग सेंटर आणलं. यावेळी नवनीत राणा मंचाच्या टोकावर उभ्या होत्या तेव्हा भाजपच्या उमेदवारांनी सांगितले भाभी खाली बघा पडाल. तेव्हा नवनीत राणा म्हणाल्या आता मी नाही पडणार. ज्यांनी बेईमानी केली त्यांचा बदला घेणार नाही तोपर्यंत नवनीत राणा शांत बसणारी नाही असे त्या म्हणाल्या. 

मी कोणाची चमचेगिरी करण्यासाठी उभी नाही

कोणी घड्याळ घेऊन उभा आहे उलटे काटे फिरवायला. सरळ करायचं नाही यावेळी ते तर त्यांचं नशीब की मी विधानसभेमध्ये फिरली नाही. नाहीतर दोन हजारांनी निवडून आले ना, दहा हजार मतांनी पडल्या असत्या इतकी ताकद या भगव्यामध्ये आहे, अशी टीका खोडके दाम्पंत्यावर नवनीत राणा यांनी केली. काय म्हणाले ते नवनीत राणा आता यापुढे कशी खासदार होते आम्ही बघतो. अरे तुमच्या तर दमच नाही. नाहीतर 2019 मध्ये या लोकांनी मला निवडून दिले.. मी लोकांची सेवा करण्यासाठी उभी आहे. कोणाची चमचेगिरी करण्यासाठी उभी नाही, अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडकेंवर केली. 

ज्यांनी माझ्याकडून पैसे घेऊन माझ्यासोबत बेइमानी केली त्यांना धडा शिकवा

काल अमरावतीत पिलांटू ओवेसी येऊन गेला. जे बाहेर पाकिस्तान आहे तसंच हैदराबाद मध्ये पाकिस्तान आहे.. तिथं राहून मला शिकवणार काय करायचं काय नाही. ओबीसींना सांगून ठेवते की तुझी दादागिरी ही पाकिस्तान मध्ये चालेल आणि तू नाही सांगणार की सहा मुलं करायचे की दहा मुलं करायचे की बारा करायचे. आधी तू सांग की तुम्ही किती घुसबैठी देशात घुसले आहे. ज्यांनी माझ्याकडून पैसे घेऊन माझ्यासोबत बेइमानी केली त्यांना यावेळी धडा तुम्ही शिकवा असे नवनीत राणा म्हणाल्या. माझ्या या तीन भाजपच्या उमेदवारांना तुम्ही साथ द्या, चौथा कोण राहील हे मी तुम्हाला नंतर सांगेल. तो चवथा कोण हे मात्र नवनीत राणा बोलल्या नाहीत.