Nashik News: नाशिक महापालिकेच्या (Nashik Municipal Corporation) आज (सोमवार दि. 16) झालेल्या महासभेत स्थायी समितीच्या सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पक्षांच्या गटनेत्यांनी सुचवलेली नावे महापौर हिमगौरी आहेर-आडके (Himgauri Adke) यांच्याकडे सुपूर्द केल्यानंतर महापौरांनी अधिकृत घोषणा केली आणि नवनिर्वाचित सदस्यांचे स्वागत केले.
या निवडीत भारतीय जनता पार्टीला 9 जागा मिळाल्या असून शिवसेना शिंदे गटाला 4, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 2 तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला 1 जागा मिळाली आहे. विशेष म्हणजे अपक्ष नगरसेवक मुकेश शहाणे (Mukesh Shahane) यांना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीकडून संधी देण्यात आली आहे, तर मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार (Mayuri Pawar) यांना शिंदे गटाच्या शिवसेनेकडून स्थायी समितीत स्थान मिळाले आहे.
Nashik News: स्थायी समितीवर निवड झालेले सदस्य
BJP : भाजप (9)
माधुरी बोलकर, नितीन निगळ, पल्लवी गणोरे, दीपाली कुलकर्णी, इंदूबाई खेताडे, आदिती पांडे, सरिता सोनवणे, जयश्री गायकवाड, मच्छिंद्र सानप.
NCP Ajit Pawar Faction: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) – 1
मुकेश शहाणे (अपक्ष)
Shiv Sena Shinde Faction: शिंदेंची शिवसेना (4)
मयुरी पवार (मनसे), किरण गामने, राहुल दिवे, रंजना बोराडे
Shiv Sena UBT: ठाकरेंची शिवसेना (2):
योगेश गाडेकर, भारती ताजनपुरे
दरम्यान, मनसेच्या मयुरी पवार यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेसह गटनोंदणी केल्यामुळे त्यांची पहिल्याच टप्प्यात स्थायी समितीवर वर्णी लागली. त्यामुळे त्यांच्या राजकीय वाटचालीला नवे वळण मिळाल्याचे मानले जात आहे.
Nashik News: सभापती पदासाठी भाजपमध्ये स्पर्धा
स्थायी समिती सभापती पदासाठी आता भाजपमध्ये जोरदार स्पर्धा रंगणार असल्याचे संकेत आहेत. उपमहापौर पदाची संधी ऐनवेळी गमावलेले मच्छिंद्र सानप, महापौर पदाच्या शर्यतीत असलेल्या दीपाली कुलकर्णी आणि माधुरी बोलकर ही नावे सभापती पदासाठी आघाडीवर मानली जात आहेत. याव्यतिरिक्त आणखी कोणाची नावे चर्चेत येतात, याकडे नाशिकच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. एकूणच, स्थायी समितीच्या बिनविरोध निवडीमुळे नाशिक महापालिकेतील सत्तासमीकरण स्पष्ट झाले असले, तरी सभापती पदासाठीची आगामी चुरस महापालिकेच्या राजकारणात नवे रंग भरणार हे मात्र निश्चित आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
