Nashik Municipal Election 2026: नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Municipal Elecion 2026) प्रचारात आता एमडी ड्रग्सचा (MD Drugs) मुद्दा थेट राजकीय व्यासपीठावर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी सिडको येथे पार पडलेल्या जाहीर सभेत शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Faction) नाशिक महानगरप्रमुख प्रवीण (बंटी) तिदमे (Pravin Tidme) यांच्यावर गंभीर आरोप करत सभेमध्ये थेट व्हिडिओ क्लिप दाखवली.

Nashik Municipal Election 2026: ड्रग्ज पेडलरशी संबंधांचा आरोप

ही सभा प्रभाग क्रमांक 24 मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आली होती. यावेळी गिरीश महाजन यांनी व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून गंभीर आरोप केला. महाजन यांनी दाखवलेल्या व्हिडिओमध्ये बंटी तिदमे यांचे काही कार्यकर्ते ड्रग्ज सेवन करत असल्याचा दावा करण्यात आला. तसेच ड्रग्स पेडलरशी तिदमे यांचे संबंध असल्याचा आरोप करत भाजपकडून शिंदे गटाला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच सभेत प्रभाग क्रमांक 24 मधील शिंदे सेनेचे उमेदवार आणि महानगरप्रमुख बिल्डरांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोपही करण्यात आला.

Nashik Municipal Election 2026: महाजनांच्या सभेनंतर मोठा गोंधळ 

दरम्यान, सभेमध्ये दाखविण्यात आलेल्या व्हिडिओनंतर सिडको परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तरुणांच्या पालकांनी “हा व्हिडिओ खोटा असून आमच्या मुलांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे,” असा दावा करत गिरीश महाजन यांचा रस्ता अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, यावर गिरीश महाजन यांनी, “जर व्हिडिओ खोटा असेल, तर संबंधितांनी पोलिसांत तक्रार दाखल करावी,” असा सल्ला दिलाय.

Nashik Municipal Election 2026: भाजपकडून तिदमे यांना घेरण्याचा प्रयत्न

या संपूर्ण प्रकारामुळे नाशिकच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. ड्रग्स सेवनाचे आरोप, पेडलरशी संबंध आणि ब्लॅकमेलिंग यांसारखे गंभीर मुद्दे थेट निवडणूक प्रचारात आल्याने वातावरण अधिकच तापले आहे.  भाजपकडून व्हिडिओच्या माध्यमातून शिंदे सेनेचे महानगरप्रमुख बंटी तिदमे यांना घेरण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. या आरोपांवर शिवसेना गट काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan on Raj Thackeray: राज ठाकरेंनी महाजनांना लाकूडतोड्या म्हणत डिवचलं, आता गिरीश महाजनांचं जशास तसं उत्तर; म्हणाले...

Raj Thackeray on Devendra Fadnavis: नाशिक दत्तक घेणारा बाप फिरकलाच नाही, फडणवीसांनी दिलेल्या आश्वासनांची भलीमोठी यादी वाचत राज ठाकरेंचा सडकून प्रहार