Nashik Mahanagarpalika Election 2026: नाशिक महापालिका निवडणुकीच्या (Nashik Mahanagarpalika Election 2026) पार्श्वभूमीवर भाजपमध्ये (BJP) उफाळलेल्याबंडखोरीला थोपवण्यासाठी राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनीनाशिकमध्ये तळ ठोकला आहे. उमेदवारी माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने भाजपसाठी हा अत्यंत निर्णायक दिवस ठरणार आहे.

विशेषतः प्रभाग क्रमांक 25 मधील सुधाकर बडगुजर(Sudhakar Badgujar) आणि माजी नगरसेवक मुकेश शहाणे (Mukesh Shahane) यांच्यातील वादावर महाजन नेमका कोणता तोडगा काढतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.आज किती बंडखोर उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतात, यावर भाजपच्या अधिकृत उमेदवारांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे “बंडोबांना थंड करण्याचीजबाबदारी आता थेट गिरीश महाजन यांच्या खांद्यावर आल्याचे पाहायला मिळत आहे.

Nashik Mahanagarpalika Election 2026:एबीफॉर्मचा गोंधळ ठरला वादाचे मूळ

भाजपमध्ये सध्या एबीफॉर्मच्या गोंधळामुळे प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. निष्ठावंत कार्यकर्ते आणि अलीकडेच पक्षात आलेल्या नेत्यांमध्ये उमेदवारीवरून संघर्ष उफाळून आला आहे. सिडको परिसरात तर स्वपक्षातील उमेदवारालाच भाजप नेत्यांकडून आव्हान दिले जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाली. यामध्ये भाजपचेबहुचर्चित उमेदवार, माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झाल्याने राजकीय भूकंप झाला.

Nashik Mahanagarpalika Election 2026: प्रभाग 25 मधील पेच

भारतीय जनता पक्षाने प्रभाग क्रमांक25 मधून शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये आलेले माजी नगरसेवकसुधाकरबडगुजर यांना उमेदवारी जाहीर केली. तर बडगुजर यांच्या पत्नी हर्ष बडगुजर यांना उमेदवारी देण्यात आली. इतकेच नव्हे तर त्याच प्रभागातून बडगुजर यांचे चिरंजीव दीपक बडगुजर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. दुसरीकडे, भाजपच्या अधिकृत यादीत माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांचेही नाव होते. त्यांना एबीफॉर्म देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्ष अर्ज दाखल करताना आधीच बडगुजर कुटुंबातील उमेदवारांनी एबीफॉर्मसह अर्ज दाखल केल्याने, छाननीत मुकेश शहाणे यांचा अर्ज बाद झाला.

Nashik Mahanagarpalika Election 2026:शहराध्यक्षांचा खुलासा

या घटनेनंतर शहरात मोठा वाद निर्माण झाला. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना खुलासा करावा लागला. त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र देखील दिले. मात्र त्याचा कोणताही परिणाम झाला नाही आणि शहाणे यांचा अर्ज बादच राहिला.

Nashik Mahanagarpalika Election 2026: मुकेश शहाणेंचा आरोप

अर्ज बाद झाल्यानंतर माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी थेट आरोप करत सांगितले की, “आपण भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत. आपल्या विरोधात पक्षात आलेल्या नव्या लोकांनी षडयंत्र रचले आहे.” उमेदवारी रद्द झाली असली तरी आपण पक्षातच राहणार असल्याचे सांगत, “विधानसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करून दाखवू,” असे खुले आव्हान त्यांनी सुधाकर बडगुजर यांना दिले आहे.

Nashik Mahanagarpalika Election 2026: इतर प्रभागांतही एबीफॉर्मचा गोंधळ

एबीफॉर्मचा वाद केवळ प्रभाग 25 पुरता मर्यादित राहिलेलानाही.त्याच प्रभागात भाजपच्या पल्लवी गणोरे आणि सुरेखानेरकर यांनाही एबीफॉर्म देण्यात आला होता. यामध्ये गणोरे यांनी आधी अर्ज दाखल केल्याने त्यांचा अर्ज वैध ठरला.प्रभाग 26 मध्येही माजी नगरसेविका अलका अहिरेयांच्या जागेवर दोन एबीफॉर्म देण्यात आले होते. मात्र त्यांनी आधी अर्ज दाखल केल्याने त्यांची उमेदवारी कायम राहिली. काही प्रभागांमध्ये एबीफॉर्म गहाळ झाले किंवा चोरीला गेल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.

Nashik Mahanagarpalika Election 2026: गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून

या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन आज नाशिकमध्ये तळ ठोकून नाराज नेत्यांची मनधरणी करणार आहेत. सुधाकर बडगुजरमुकेश शहाणे वादावर तोडगा निघतो का? किती बंडखोर माघार घेतात? आणि भाजप अंतर्गत असंतोषावर पडदा पडतो का? याची उत्तरे आजच्या दिवसात मिळणार आहेत.

आणखी वाचा 

Nashik Mahanagarpalika Election 2026: नाशिकमध्ये भाजपला बंडखोरीचे ग्रहण, शहर सरचिटणीस अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात; आमदार अन् शहराध्यक्षांवर सनसनाटी आरोप, म्हणाले, गिरीश महाजन...