Nashik Election Result 2026 : नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होताच शहराच्या राजकारणात मोठे उलथापालथीचे चित्र समोर येत आहे. नाशकात पहिला अधिकृत निकाल हाती आला असून, भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी विजयाचं खातं उघडत जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपचे नेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) आणि दिनकर पाटील (Dinkar Patil) यांनी स्पष्ट विजय मिळवला, तर शिंदे गटाच्या शिवसेनेने देखील काही जगणाव्र विजय नोंदवत आपली ताकद दाखवून दिली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेची जोरदार सुरुवात, भाजपला धक्का
शिंदे गटाच्या शिवसेनेने प्रभाग क्रमांक 16 मधून एकाच वेळी चार जागांवर विजय मिळवला आहे.
या प्रभागातून राहुल दिवे, आशा तडवी, पूजा नवले, ज्योती जोंधळे हे उमेदवार विजयी झाले आहेत.
विशेष म्हणजे, प्रभाग 16 मध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून, हा प्रभाग शिंदे गटाच्या शिवसेनेचा बालेकिल्ला ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
प्रभाग 25 : सुधाकर बडगुजर यांचा दणदणीत विजय
नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक 25 मधून भाजपचे सुधाकर बडगुजर यांनी तब्बल 14,864 मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
याच प्रभागातून
भाजपच्या साधना मटाले 3,647 मतांनी विजयी,
शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कविता नाईक 763 मतांनी विजयी,
ठाकरे गटाच्या शिवसेनेचे मुरलीधर भामरे 906 मतांनी विजयी झाले आहेत.
प्रभाग 9 मध्ये भाजपचा डंका, दिनकर पाटील विजयी
नाशिकच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये भाजपचा एकतर्फी डंका पाहायला मिळाला आहे.
मनसेतून भाजपमध्ये प्रवेश केलेले दिनकर पाटील विजयी झाले असून, त्यांच्यासोबत -
अमोल पाटील (पुत्र),
भारती धिवरे,
संगीता घोटेकर यांनीही विजय मिळवला आहे.
या प्रभागात भाजपने पूर्ण पॅनल जिंकत आपली ताकद अधोरेखित केली आहे.
प्रभाग 7 : भाजप–शिंदे गटात थेट लढत
नाशिकच्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजप आणि शिंदे गटात अटीतटीची लढत पाहायला मिळाली.
प्रभाग 7 अ
सुरेश पाटील (भाजप) – 10,695 मते (विजयी)
राजेंद्र सूर्यवंशी (शिवसेना) – 8,279
प्रभाग 7 ब
हिमगौरी आहेर आडके (भाजप) – 11,184 (विजयी)
रोहिणी शिरसाट (शिंदे गट) – 9,992
प्रभाग 7 क
स्वाती भामरे (भाजप) – 11,740 (विजयी)
वंदना रकीबे – 7,062
प्रभाग 7 ड
अजय बोरस्ते (शिंदे गट) – 13,022 (विजयी)
योगेश हिरे (भाजप) – 6,920
प्रभाग 20 : युतीचा विजय, भाजपला धक्का
प्रभाग क्रमांक 20 मधून
युतीचे (शिंदे गट) प्रदीप बागुल 385 मतांनी विजयी
भाजपचे सतीश निकम यांचा पराभव
यामुळे या प्रभागात शिंदे गटाची सरशी ठरली आहे.
प्रभाग 29 : अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे आघाडीवर
भाजपसाठी प्रतिष्ठेचा समजला जाणारा प्रभाग क्रमांक 29 मध्ये अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांनी आघाडी घेतली आहे.
5व्या फेरीअखेर मुकेश शहाणे 4 हजार मतांनी आघाडीवर
भाजपचे दीपक बडगुजर पिछाडीवर
मतदानाचा आढावा
नाशिक शहरातील 1,563 मतदान केंद्रांवर मतदान पार पडले. यंदा 56.76 टक्के मतदान नोंदवले गेले असून, 2017 च्या तुलनेत सुमारे 5 टक्क्यांची घट झाली आहे. 31 प्रभागांतील 122 जागांसाठी 735 उमेदवार रिंगणात असून, सत्तास्थापनेसाठी 63 जागांचा आकडा निर्णायक ठरणार आहे.
आणखी वाचा
