Nashik Election 2026 Voting: राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी (Mahanagarpalika Election 2026) आज (दि. 15) मतदान प्रक्रिया सुरू असताना नाशिक (Nashik) आणि धुळे (Dhule) जिल्ह्यातून हिंसक आणि गोंधळाच्या घटना समोर आल्या आहेत. नाशिकमध्ये भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला झाला असून, धुळे शहरात थेट मतदान यंत्राची तोडफोड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

Nashik Election 2026 Voting: भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला

नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजप उमेदवार नितीन खोले यांच्या घरावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नितीन खोले हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत त्यांच्या घरावर धाव घेतल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला. या प्रकरणातून शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोप झाल्याने काही काळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसत होती.  

Dhule Election 2026 Voting: धुळे शहरात मतदान केंद्रावर राडा

दरम्यान, धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील एका मतदान केंद्रावरही गंभीर प्रकार घडला आहे. मिरच्या मारुती प्राथमिक विद्या मंदिरातील मतदान केंद्रात असलेल्या खोली क्रमांक 1 मधील ईव्हीएम मशीनची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी आरोप केला आहे की, भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी खोली क्रमांक 1 मध्ये शिवीगाळ करत मतदान यंत्रांची तोडफोड केली. या घटनेनंतर मतदान केंद्रावर गोंधळ उडाला असून, मतदान प्रक्रिया काही काळासाठी थांबवावी लागल्याची माहिती आहे.

Continues below advertisement

Nashik Election 2026 Voting: नाशिकच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ 

नाशिकच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये मतदान केंद्रावर गोंधळ झालाय. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांकडून धनुष्यबाण दाबल्यानंतर ईव्हीएममध्ये भाजपचा लाईट लागत असल्याचा दावा करण्यात आलाय. मतदारांकडून देखील संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी तक्रार करण्यात आली आहे. तक्रार करणाऱ्या मतदारांना धमकवलं जात असल्याचा आरोप देखील शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी केलाय. ही घटना प्रभाग क्रमांक २४ मधील ग्रामदेव प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर घडली.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik Election 2026 Voting: सुधाकर बडगुजरांच्या कार्यालयाबाहेर पैसे वाटपाचा आरोप; अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे पोहोचताच...; नाशिकमध्ये मोठा गोंधळ

BMC Election 2026 Uddhav Thackeray: संविधान म्हणते मतदान करा अन् निवडणूक आयोग म्हणते करुनच दाखवा; देवेंद्र फडणवीस अन् चोर कंपनी हारली म्हणत उद्धव ठाकरेंनी सगळंच काढलं