Nanded Election 2026 : राज्यात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. त्यामुळे आता मतदान आणि निकालनंतरच मतदारांचा अंतिम कौल कळणार आहे. असे असताना प्रचाराच्या शेवटचा दिवस सर्वार्थानं वादळी ठरला आहे. काही ठिकाणी पैसे वाटप करण्यात येत असल्याची माहिती समोर आलीय. तर काही ठिकाणी पक्षाचे कार्यकर्ते आप-आपसात भिडल्याचे बघायला मिळालंय.
दरम्यान अशीच एक घटना नांदेडच्या (Nanded Municipal Corporation Election 2026) प्रभाग क्रमांक एकमध्ये घडलीय. प्रभाग क्रमांक एक मधील काँग्रेसच्या (Congress) उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव (Shivaji Bhalerao) यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय. तोंडाला रुमाल बांधून तीन इसम हातात तलवार घेऊन हल्ला करत होते. पण सुदैवाने उमेदवाराच्या पतीला लागले नाही. पोलीस सूत्रांचा माहितीनुसार चोरीच्या दृष्टीने हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या या प्रकरणाचा तपास नांदेड पोलीस करत आहेत. तर हल्लेखोरांनी 'तू प्रचार कसा करतोस, खूप भाषणं ठोकतोय. तुझी बिर्याणी करून टाकू' अशी धमकी देत हल्ला केल्याचे शिवाजी भालेराव म्हणाले.
Shivaji Bhalerao : आम्हाला निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही काय?
नांदेड महापालिकेच्या रणधुमाळीत प्रचाराची मंगळवारी सायंकाळी सांगता झाली. मात्र असे असताना काही तासातच काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक एक मधील उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव (Shivaji Bhalerao) यांच्यावर अज्ञात व्यक्तींकडून तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झालाय. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह नांदेडचे खासदार प्रा. रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. तर या घटनेचा पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी सूचनाही त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना केलीय. तर यावेळी बोलताना त्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर भाजपच्या दोन्ही खासदारांनी सुनावलं आहे. दरम्यान, या हल्यानंतर भयभयीत झालेल्या शिवाजी भालेराव यांनी आम्हाला निवडणूक लढवण्याचा अधिकार नाही काय? गुन्हेगारीवर आळा घातला जाईल का? असा सवाल उपस्थित केला आहे.
Nanded Crime : तीन दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी केला तलवारीने हल्ला
मिळलेल्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक एकमधील काँग्रेसच्या उमेदवार सारिका भालेराव यांचे पती शिवाजी भालेराव यांच्यावर तरोडा खुर्द भागातील त्यांच्या बेलानगर येथील निवासस्थानी तीन दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी तलवारीने हल्ला केला. हा हल्ला नेमका कशासाठी झाला हे पोलिसांनी स्पष्ट केले नाही. या घटनेबाबत भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी माहिती घेत अधिक तपास करत आहे.
महत्वाच्या बातम्या: