भंडारा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला आहे. तर काँग्रेसने (Congress) 288 जागांपैकी 101 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापैकी केवळ 16 जागाच काँग्रेसने जिंकल्या आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर (EVM) आरोप केला जात आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी एकूण मतांमध्ये ७६ लाख मतांची वाढ कशी झाली? असा सवाल उपस्थित करत निवडणूक आयोगावर (Election Commission) निशाणा साधला होता. आता पुन्हा नाना पटोले यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर (BJP) हल्लाबोल केला आहे. 


काही दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. सायंकाळी साडेपाच वाजेनंतर जे मतदान झालं आहे, त्याचे फोटो दाखवा. हे मतदान कुठल्या सेंटरवर झालं? साडेसात टक्क्यांनी मतदान कसं वाढलं? या सर्वाचं उत्तर निवडणूक आयोगाने (Election Commission) दिलं पाहिजे, असे त्यांनी म्हटले होते. तसेच जनतेची मतं चोरण्याचं आणि डाका टाकण्याचं काम निवडणूक आयोग करत असल्याचा आरोप देखील नाना पटोले यांनी केला होता. 


महाराष्ट्रात सगळीकडं आक्रोश : नाना पटोले


आता नाना पटोले यांनी पुन्हा एकदा तोफ डागली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जे यश आलेलं आहे तो लाडक्या बहिणींचा प्रभाव नव्हता. हा सगळा प्रभाव निवडणूक आयोग आणि भाजप या दोघांनीही मिळून केलेल्या पापाचे फळ आहे. महाराष्ट्रात जनतेचं सरकार नं येता निवडणूक आयोगाच्या कृपेनं आलेलं भाजपचं सरकार येतंय. त्यामुळं महाराष्ट्रात सगळीकडं आक्रोश आहे. लोकं सरकार आमचं आहे, असं म्हणायलाच तयार नाही. भाजपवाल्यांचे चेहरे पाहिले तरी त्यांनाही असं वाटतंय की, आम्ही तर मतदान मारलंचं नाही, हे सरकार आलं कुठून? भाजपवाल्यांच्या मनातही हीच परिस्थिती असल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. आता नाना पटोले यांच्या टीकेवर भाजप काय पलटवार करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


बंटी शेळकेंचा नाना पटोलेंवर गंभीर आरोप


दरम्यान, काँग्रेस नेते आणि नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार बंटी शेळके यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दरम्यान, पराभव झाल्यानंतर बंटी शेळके यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नाना पटोले RSS चे एजंट असल्याचं बंटी शेळके म्हणाले होते.  


इतर महत्त्वाच्या बातम्या 


मतदारांच्या मनातील आमदार! साकोलीत नाना पटोले जिंकले, मात्र, पराभूत अविनाश ब्राह्मणकरांच्या बॅनरनं भुवया उंचावल्या


Dhananjay Munde : नाना पटोलेंचा निवडणूक आयोगावर निशाणा, आता धनंजय मुंडेंचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'जनतेनं आम्हाला...'