Nalasopara Vidhan Sabha Election 2024 : नालासोपारा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या राजन नाईक यांचा विजय झाला आहे. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे संदीप पांडे यांना उमेदवारी देण्यात आली, तर महायुतीने भाजपचे राजन नाईक यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. मात्र, असं असलं तरी या मतदारसंघात बहुजन वंचित आघाडीचं वर्चस्व मानलं जात होतं, पण यंदा जनतेने क्षितीज ठाकूर यांच्याकडे पाठ फिरवली. क्षितिज  ठाकूर यांचा पराभव झाला. क्षितिज ठाकूर यांनी बहुजन वंचित आघाडीच्या तिकीटावर नालासोपारा विधानसभेवर तीन वेळा निवडून आले होते. 1990 च्या दशकापासून वसई, विरार आणि नालासोपारा शहरावर हितेंद्र ठाकूरांचं एकहाती वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळेच 2009 साली वसई विधानसभेचे अडीच भाग झाल्यानंतर ही तीनही विधानसभा हितेंद्र ठाकूरांकडे राहिल्या आहेत.

नालासोपारा विधानसभा मतदारसंघ


नालासोपारा विधानसभा क्षेत्र महाराष्ट्र राज्याच्या पालघर जिल्ह्यातील एक महत्त्वपूर्ण मतदारसंघ आहे, ज्यामध्ये वसई तालुक्यातील काही भागांचा समावेश होतो. या क्षेत्रात वसई-विरार नगर निगम (VVMC) देखील समाविष्ट आहे. नालासोपारा हा पश्चिम रेल्वे विभागाच्या अखत्यारीत येतो. या क्षेत्राची लोकसंख्या आणि पायाभूत सुविधांची वाढ होत असल्याने, या विधानसभा क्षेत्राचे राजकीय महत्त्व सतत वाढत आहे.   

मतदारसंघाचा राजकीय इतिहास


नालासोपारामध्ये बहुजन विकास आघाडी (BVA) गेल्या तीन विधानसभा निवडणुकांपासून प्रबळ स्थितीत आहे. 2009 मध्ये, क्षितिज ठाकूर यांनी BVA च्या उमेदवार म्हणून येथे विजय प्राप्त करून एक नवीन राजकीय युग सुरू केले. ठाकूर कुटुंबीय नालासोपारा क्षेत्रात वर्षांपासून सक्रिय आहे आणि स्थानिक लोकांमध्ये त्यांची मजबूत पकड आहे. क्षितिज ठाकूर यांनी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील विजय प्राप्त केला, ज्यामुळे BVA चा प्रभाव नालासोपाऱ्यात ठामपणे आहे.  

मतदारसंघातील समस्या


नालासोपारा विधानसभा मतदारसंघात अनेक समस्या प्रलंबित आहेत. नालासोपाऱ्यात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या आहे. आरोग्याची सेवा देखील तोकडी आहे. फेरीवाल्यांनी येथे उच्छाद मांडला आहे. नालासोपाऱ्यात अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात आहे. यामुळेच अनेक अनधिकृत चाळी, इमारती उभ्या राहिल्या आहेत. इथे पाण्याची समस्याही प्रमुख आहे. दरवर्षी पावसाळ्यात येथील विविध भागात पाणी साचून संपूर्ण जनजीवन विस्कळीत होतं.

2019 चा विधानसभा निकाल


2019 च्या निवडणुकीत क्षितिज ठाकूर यांनी नालासोपारा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. क्षितिज ठाकूर यांना एकूण 1,49,868 मते मिळाली, जे त्यांच्यावर लोकांचा विश्वास दर्शवतात. याशिवाय, 2014 मध्येही क्षितिज ठाकूर यांनी विजयाची परंपरा कायम ठेवली होती.

नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती



  • क्षितिज ठाकूर - बहुजन वंचित आघाडी

  • संदीप पांडे - काँग्रेस 

  • राजन नाईक - भाजप


नालासोपारा विधानसभा निवडणूक 2019 निकाल



  • क्षितिज ठाकूर (बहुजन वंचित आघाडी) - 149868 मते (विजयी)

  • प्रदीप शर्मा (शिवसेना) - 106139 मते

  • प्रवीण गायकवाड (वंचित बहुजन आघाडी) - 3487 मते


नालासोपारा विधानसभा निवडणूक 2014 निकाल



  • क्षितिज ठाकूर (बहुजन वंचित आघाडी) - 113566 मते (विजयी)

  • राजन नाईक (भाजप) - 59067 मते

  • जयराम चव्हाण (शिवसेना) - 40321 मते


महत्त्वाच्या इतर बातम्या :