Nagpur Election 2026 : निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच नागपुरात रक्तरंजित राडा; भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला, काँग्रेसवर गंभीर आरोप
.Nagpur Municipal Election 2026 : नागपुरातील महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच हिंसक वळण लागलं असून शहरात रक्तरंजित राडा झाला आहे. नागपुरात भाजप उमेदवारवर जीवघेणा हल्ला झाला आहे.
रजत वशिष्ठ, एबीपी माझाLast Updated: 15 Jan 2026 07:10 AM

पार्श्वभूमी
Nagpur Municipal Election 2026 : नागपुरातील महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच हिंसक वळण लागलं असून शहरात रक्तरंजित राडा झाला आहे. नागपुरात भाजप उमेदवारवर जीवघेणा हल्ला झाला आहे. प्रभाग 11चे भाजप उमेदवार भूषण शिंगणे...More
Nagpur Municipal Election 2026 : नागपुरातील महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच हिंसक वळण लागलं असून शहरात रक्तरंजित राडा झाला आहे. नागपुरात भाजप उमेदवारवर जीवघेणा हल्ला झाला आहे. प्रभाग 11चे भाजप उमेदवार भूषण शिंगणे हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहे. त्यांना नागपूरच्या मेयो या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रभाग 11 मधील काँग्रेस उमेदवार आणि त्याच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा भाजपचा आरोप आहे. या हल्ल्यात भूषण शिंगणे यांच्या चेहऱ्यावर आणि नाकावर जोरदार मार लागला असून हात फ्रॅक्चर झाला आहे.BJP vs Congress Clash : फायटर अन् दगडाने मारहाण, भूषण शिंगणे गंभीर जखमीदरम्यान, घटनेची माहिती मिळताच नागपूरच्या मेयो रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्ते आणि नेते जमले. मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आलीय. अशातच यावर बोलताना भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी म्हणाले कि, गोरेवाडा परिसरात काही असामाजिक तत्व वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबतच पैशांचा देखील वाटप करत आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी गेलेल्या भाजप उमेदवार भूषण शिंगणेवर हल्ला करण्यात आला. फायटरने त्यांच्या नाकावर मारण्यात आलं. त्यामुळे मोठ्याप्रमाणात रक्तबंबाळ ते झालेत. खाली पडल्यावर दगडाने मारलं. त्यांचा हात फॅक्चर झाला असून इतर सहकारीही जखमी झाले आहेत. या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र समाजकारण करत असताना अशा पद्धतीने हल्ला करणे हे निषेधार्त आहे. इथेच नाही तर काँग्रेसकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील ताफा अडवण्यात आला. अशा पद्धतीने दडपशाही करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी केले आहेत.Nagpur News : बावनकुळे यांचा रस्ता काँग्रेस उमेदवार अन् कार्यकर्त्यांनी अडवलानागपूरच्या प्रभाग 10 अंतर्गत कुतुबशहानगर झोपडपट्टीमध्ये आपल्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त गेलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा रस्ता काँग्रेस उमेदवार आणि सोबतच्या कार्यकर्त्यांनी अडवला होता. बावनकुळे वस्तीमध्ये कार्यकर्त्याच्या घरी नाही तर निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी आले होते, असा आरोप काँग्रेस उमेदवार प्रमोद ठाकूर आणि सोबतच्या कार्यकर्त्यांचा होता. निमुळत्या गल्लीच्या तोंडावर काँग्रेस उमेदवार प्रमोद ठाकूर आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केल्यामुळे पोलिसांना त्यांना तिथून बळजबरीने हटवावे लागले. या प्रकरणावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य करत स्पष्टीकरण दिलंय.नागपूरच्या कुतुबशहा नगरमधील राजू देवगडे माझे फार जवळचे कार्यकर्ते आहे. त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी मला बोलावले होते. कार्यकर्त्यांची भेटीगाठी त्यांच्या घरी घेत होतो. तिथल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला की मी निवडणुकीच्या प्रचारासाठी किंवा वेगळ्या कारणाने आलो आहे, मात्र हा त्यांचा गैरसमज होता. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे ते त्या ठिकाणी आले होते. त्यांना सर्व प्रकार सत्यता समजली आहे. काँग्रेसचा झालेला गैरसमज संपला असेल असं मला वाटते. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात पैसे वाटप?.शिंदेसेनेचा आरोप, घटनास्थळी पोलीस दाखल