एक्स्प्लोर

Nagpur Election 2026 : निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच नागपुरात रक्तरंजित राडा; भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला, काँग्रेसवर गंभीर आरोप

Nagpur Municipal Election 2026 : नागपुरातील महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येलाच हिंसक वळण लागलं असून शहरात रक्तरंजित राडा झाला आहे. नागपुरात भाजप उमेदवारवर जीवघेणा हल्ला झाला आहे.

Nagpur Municipal Election 2026 : नागपुरातील महापालिका निवडणुकीच्या पूर्वसंध्येला हिंसक वळण लागलं असून शहरात रक्तरंजित राडा झाला आहे. नागपुरात भाजप उमेदवारवर जीवघेणा हल्ला झाला आहे. प्रभाग 11चे भाजप उमेदवार भूषण शिंगणे हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहे. त्यांना नागपूरच्या मेयो या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रभाग 11 मधील काँग्रेस उमेदवार आणि त्याच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी हा जीवघेणा हल्ला केल्याचा भाजपचा आरोप आहे. या हल्ल्यात भूषण शिंगणे यांच्या चेहऱ्यावर आणि नाकावर जोरदार मार लागला असून हात फ्रॅक्चर झाला आहे.

BJP vs Congress Clash : फायटर अन् दगडाने मारहाण, भूषण शिंगणे गंभीर जखमी

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नागपूरच्या मेयो रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर भाजप कार्यकर्ते आणि नेते जमले. मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. अशातच यावर बोलताना भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी म्हणाले कि, गोरेवाडा परिसरात काही असामाजिक तत्व वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोबतच पैशांचा देखील वाटप करत आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी गेलेल्या भाजप उमेदवार भूषण शिंगणेवर हल्ला करण्यात आला. फाने त्यांच्या नाकावर मारण्यात आलं. त्यामुळे मोठ्याप्रमाणात रक्तबंबाळ ते झालेत. खाली पडल्यावर दगडाने मारलं. त्यांचा हात फॅक्चर झाला असून इतर सहकारीही जखमी झाले आहेत. या संदर्भात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र समाजकारण करत असताना अशा पद्धतीने हल्ला करणे हे निषेधार्त आहे. इथेच नाही तर काँग्रेसकडून चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील ताफा अडवण्यात आला. अशा पद्धतीने दडपशाही करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप भाजपचे शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.

Nagpur News : बावनकुळे यांचा रस्ता काँग्रेस उमेदवार अन् कार्यकर्त्यांनी अडवला

नागपूरच्या प्रभाग 10 अंतर्गत कुतुबशहानगर झोपडपट्टीमध्ये आपल्या कार्यकर्त्याच्या वाढदिवसानिमित्त गेलेले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा रस्ता काँग्रेस उमेदवार आणि सोबतच्या कार्यकर्त्यांनी अडवला होता. बावनकुळे वस्तीमध्ये कार्यकर्त्याच्या घरी नाही तर निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी आले होते, असा आरोप काँग्रेस उमेदवार प्रमोद ठाकूर आणि सोबतच्या कार्यकर्त्यांचा होता. निमुळत्या गल्लीच्या तोंडावर काँग्रेस उमेदवार प्रमोद ठाकूर आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केल्यामुळे पोलिसांना त्यांना तिथून बळजबरीने हटवावे लागले. या प्रकरणावर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य करत स्पष्टीकरण दिलंय.

नागपूरच्या कुतुबशहा नगरमधील राजू देवगडे माझे फार जवळचे कार्यकर्ते आहे. त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांनी मला बोलावले होते. कार्यकर्त्यांची भेटीगाठी त्यांच्या घरी घेत होतो. तिथल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण झाला की मी निवडणुकीच्या प्रचारासाठी किंवा वेगळ्या कारणाने आलो आहे, मात्र हा त्यांचा गैरसमज होता. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे ते त्या ठिकाणी आले होते. त्यांना सर्व प्रकार सत्यता समजली आहे. काँग्रेसचा झालेला गैरसमज संपला असेल असं मला वाटते. असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Nashik News: रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
रिक्षाची वाट पाहत होते, भरधाव दुचाकीने धडक दिली; 24 दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या दिलीप काळेंची प्राणज्योत मालवली, नाशिकमध्ये रस्त्यांच्या दुरवस्थेचा आणखी एक बळी
Embed widget