Nagpur Municipal Corporation Election 2026 : नागपूर महानगरपालिकाच्या निवडणुकीत (Nagpur Election 2026) भाजपच्या (BJP) अधिकृत उमेदवारांविरोधात बंडखोरी करत पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या बंडखोरांवर पक्षाने कारवाईचा बडगा उगारला आहे. पक्षातील 32 जणांना भाजपने तब्बल सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित केले आहे. महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत हि निलंबनाची कारवाई (BJP Suspends Action on Rebellion) करण्यात आली आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशानुसार कारवाई झाल्याची सूत्रांची माहिती आहे. वारंवार समजूत काढल्यानंतरही पक्ष आदेश जुमाननाऱ्यावर ही निलंबनाची (Rebellion) कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

Nagpur Election 2026 : पक्षातील 32 जणांविरोधात कारवाईचा बडगा

भाजपच्या कारवाईमध्ये प्रभाग 14 मधून बंडखोरी करणारे सुनील अग्रवाल या ज्येष्ठ नेत्यासह प्रभाग 17 मधील विनायक डेहनकर, प्रभाग 18 मधील धीरज चव्हाण प्रमुख बंडखोरांचा समावेश आहे. प्रभाग 19 मधील प्रकाश घाटे आणि पापा यादव, प्रभाग 26 मधील सुनील मानापुरे, प्रभाग 32 मधील दीपक चौधरी, प्रभाग 34 मधील आसावरी कोठिवान आणि सुनील मानेकर या बंडखोरांना ही निलंबित करण्यात आले आहे.

Continues below advertisement

BJP Suspends Action on Rebellion: भाजपकडून 2017 मध्येही कारवाई, 65 जणांना काढले पक्षातून बाहेर

विशेष म्हणजे 2017 मध्ये भाजपने अशाच पद्धतीने 65 जणांना पक्षाच्या बाहेर काढले होते. 32 बंडखोरांना बाहेर काढल्यामुळे त्यांना छुप्या पद्धतीने मदत करणाऱ्यांना धडा मिळेल आणि ते आजपासून पक्षाच्या अधिकृत भूमिकेशी सहमत होऊन पक्षासाठी प्रचार करतील अशी अपेक्षा भाजपला आहे. त्यामुळे आता या कारवाईनंतर बंडखोर उमेदवार नेमकी काय पाऊलं टाकतात याकडे साऱ्याचे लक्ष लागले आहे.

BMC Election 2026: मुंबई भाजपकडून जवळ जवळ 26 जणांचे 6 वर्षांसाठी निलंबन

दुसरीकडे, मुंबई महापालिकेत अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केलेल्यांचे पक्षश्रेष्ठींकडून निलंबन करण्यात आलं आहे. मुंबई भाजपकडून जवळ जवळ 26 जणांचे 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आल्याची माहिती आहे. महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत हि निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या निर्देशानुसार कारवाई झाल्याची सूत्रांची माहिती आहे. यामध्ये माजी नगरसेविका आसावरी पाटील, नेहल शहा, जान्हवी राणे यांचे देखील निलंबन करण्यात आलं आहे. सोबतच, दिव्या ढोले, जयमुरगन नाडार, शोभा साळगावकर यांच्यावर देखील पक्षविरोधी कारवाया केल्याने निलंबनाची कुऱ्हाड चालवण्यात आली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या