Devendra Fadnavis : मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष झाला आहे. सर्वच निवडणुकीत भाजप नंबर एकचा पक्ष ठरला आहे असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. आपले कार्यकर्ते मनात आणले तर काय करु शकतात हे पाहायला मिळालं. आपल्या मित्रपक्षासह आपण मैदानात उतरलो होतो. मुंबईच्या जनतेने विकासाच्या अजेंड्याला पूर्ण समर्थन दिल्याचे फडणवीस म्हणाले. आपल्याला मुंबईत 89 जागा मिळाल्या. काही जागा कमी मतांनी गेल्या. त्या जागा आल्या असत्या तर शतक पार केलं असंत थोड दूर राहिलो. पण मुंबईकरांनी भरपूर दिल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं. जे लोक मराठी माणसाला जहागिर समजत होते त्यांना हे लक्षात आलं की मुंबईचा मराठी माणूस हा विकासासोबत आहे भाजपसोबत आहे.
उबाठा आपल्यापेक्षा 30 जागा जास्त लढवून ते 27 टक्क्यावर आहेत, अपण 45 टक्क्यांवर
मागील वेळी 82 जागा मिळाल्या होत्या. यावेली 89 जागा मिळाल्या आहेत. मागील वेळी 227 लढवून 82 जागा जिंकल्या होत्या. यावेली 135 जागा लढवून 89 जागा जिंकून आल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 45 टक्के मतदान आपल्याला मिळालं आहे. उबाठा आपल्यापेक्षा 30 जागा जास्त लढवून ते 27 टक्क्यावर आहेत. हा विजय मुंबईकरांनी दिला असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आपले सहकारी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात 29 जागा मिलाल्या. त्यांच्या जागा थोड्या मतांनी गेल्या. भाजप आणि शिवसेनेचा विचार केला तर पूर्ण बहुमत मिळालं आहे. आपल्या 89 सीट महत्वाच्या आहेत कारण गेल्या 3 निवडणुकीत मोठ्या पक्षाला कधीच एवढ्या जागा मिळाल्या नवहत्या
मुंबईच्या मराठी माणसाने आम्हाला मतदान केले
जे लोक मुंबईतील मराठी माणसाला आपली जहागीर समजत होते, त्यांना हे लक्षात आलं की मुंबईचा मराठी माणूस हा विकासासोबत आहे भाजपसोबत आहे. मुंबईच्या मराठी माणसाने आम्हाला मतदान केले, मुंबईच्या सर्व लोकांनी आम्हाला मतदान केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी मतदान केले. झोपडपट्टी, चाळींमध्येही निवडून आलो, कोळीवाडामध्ये निवडून आले, सर्व ठिकाणी यश मिळाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
महायुतीचा महापौर होईल त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागू
हा विजय टीम मुंबईचा विजय आहे. एकत्रीतपण सुनियोजीत प्रयत्न केले होते. या विजयामुळं आम्ही आनंदीत आहोत पण आनंदाला कधीच उन्मादात होऊ देणार नाही. महायुतीचा महापौर होईल त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागू असे मुख्यमंत्री म्हणाले. आमचा पहिला अजेंडा हा आहे की, मुंबई जगातलं पहिलं उत्तम शहर करायचं आहे. एकही मराठी माणूस बाहेर जाणार नाही हा आमचा अजेंडा आहे. चाळीत झोपडपट्टीत राहणार लोक सगळ्या लोकांना घर देण्याचा अजेंडा आहे. जीवन सुखद झालं पाहिजे हवा शुद्ध झाली पाहिजे हाच आमचा अजेंडा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईकरांनी विश्वास देतो की दोन ते तीन वर्षात मुंबई लव्हेबल आणि लिव्हेबल करु असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी सर्व विजयी नगरसेवकांचे अभिनंदन केले.
महत्वाच्या बातम्या: