Raj Thackeray on Sharad Pawar : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करण्याला शरद पवार हेच (Sharad Pawar) जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (MNS Raj Thackeray) यांनी केला आहे. आत्ताच्या स्थितीइतकी घाणेरडी स्थिती कधीही झाली नव्हती असे राज ठाकरे म्हणाले. नारायण राणे ज्यावेळी शिवसेनेतून फुटले त्यावेळी ते शरद पवार यांच्यासोबत जाणार होते. मात्र, ऐनवेळी शरद पवारांनी हात वर केल्याचे राज ठाकरे म्हणाले.


नारायण राणे शरद पवार यांच्यासोबत जाणार होते पण...


1978 ला शरद पवारांनी जर अशा राजकारणाची सुरुवात केली नसती तर हा उद्योग कोणालाच सुचला नसता असे राज ठाकरे म्हणाले. नारायण राणे हे पहिले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार होते, पण बाहेर पडल्यावर शरद पवारांनी हात वर केले. त्यानंतर राणे काँग्रेसमध्ये गेल्याचे राज ठाकरे म्हणाले. हे सगळं शरद पवारांनीचं सांगितल्याचेही राज  ठाकरे म्हणाले. शरद पवारांनी सुरु केलेल्या गोष्टीची पुढे सवय होत गेली. आज महाराष्ट्रातील परिस्थिती खूप लाजीरवाणी झाली आहे. कोण कुठेही जात आहे. ही निवडणूक मतदारांच्या मतांच्या अपमानाचा बदला घेण्याची असल्याचे राज ठाकरे म्हणाले. 


महाराष्ट्र आताच्या परिस्थितीतून बाहेर येईल


पक्ष फोडाफोडीवर घटनेवरही राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. कोणत्याही पक्षाच्या बाबतीत अशा गोष्टी होता कामा नये, असे राज ठाकरे म्हणाले. मी  शिवसेनेतून बाहेर पडलो, त्यावेळी मी पक्ष फोडला नाही. मला पक्षातून इतर नेते फोडून पक्ष निर्माण करायचा नव्हता असे राज ठाकरे म्हणाले. मला वेळ लागला तरी चालेल असे राज ठाकरे म्हणाले. पण महाराष्ट्रावर आताच्या परिस्थितीतून बाहेर येईल. महाराष्ट्रावर खोलवर संस्कार झाले आहेत. यातून महाराष्ट्र बाहेर येईल. महाराष्ट्र खूप मोठा आहे. असे राज ठाकरे म्हणाले. 


महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल, भाजपचा मुख्यमंत्री होईल


महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचेच सरकार येईल असा दावा राज ठाकरे यांनी केला. पण एवढही सोप नाही असेही राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रात भाजपचा मुख्यमंत्री होईल, पण आमच्या साथीने असेही राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातील सगळ्या पुतण्यांना घेऊन छगन भुजबळांनी एक पक्ष काढावा असेही राज ठाकरे म्हणाले. भुजबळ देखील पुतण्याबरोबरच गेले. काकांबरोबर कुठे राहिले, असेही राज ठाकरे म्हणाले. अजित पवारांची एक गोष्ट आवडते. ती म्हणजे अजित पवारांनी कधीही जातीपातीचं राजकारण केलं नाही असेही राज ठाकरे म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


Raj Thackeray : कोणत्या बहिणीने फुकट पैसे मागितले? अशाने महाराष्ट्र दिवाळखोरीत निघेल; लाडकी बहिण योजनेवरून राज ठाकरेंनी फटकारले