Avinash Jadhav on BJP:भारतीयजनतापक्षजिंकतनाहीये, तरत्याठिकाणचेउमेदवारजिंकतायत. जेतिथलेस्थानिक परंपरेनुसारउमेदवारआहेततेजिंकतायत. नवपाडामध्येचबघायाचंझालंतरनारायणपवारहेचनगरसेवकआहेत. तरदुसरे नगरसेवक अशोक राऊळ हे आहेत. नारायणपवारयांचामूळपक्षकाँग्रेसआहे, तर अशोक राऊळ यांचापक्षराष्ट्रवादीआहे. त्यामुळेहिसगळीजीलोकआहेतीवेगळीचआहे. भाजपफक्तया उमेदवारांवर भाजपचास्टॅम्पमारतेय. त्यामुळेयाउमेदवारांना (Mumbai Municipal corporation result 2026) निवडूनआणण्यात भाजपचेकाहीहीश्रेयनाही, अशीप्रतिक्रयादेतमनसेनेतेअविनाशजाधवांनी (Avinash Jadhav on BJP) भाजपवरहल्लाबोलकेलाआहे.
मुंबई मनपाच्या निकालात 89 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर उद्धव ठाकरेंची शिवसेना 65 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. महायुतीतील एकनाथ शिंदेंची शिवसेना 29 जागांसह तिसऱ्या स्थानावर गेली आहे. निकालानंतरएकनाथ शिंदेंनी आपल्या सर्व नगरसेवकांना हॉटेलमध्ये ठेवलं आहे. महापौरांच्या निवडणुकीआधी फोडाफोडी होण्याची भीती आहे. त्यामुळे सर्व नेते आपआपल्या पक्षातील नगरसेवकांना सांभाळण्यात गुंतले आहेत. अशातच आता मुंबईमहापालिकेवरकुणाचा महापौर विराजमान होणार याची उत्सुकता लागली आहे. अशातचआतामनसेनेतेअविनाशजाधवांनीभाजपवरहल्लाबोलकेलाआहे.
BJP Corporaters Mumbai : मुंबईबाहेर जाऊ नका, भाजपच्या सूचना
पुढचे आठ दिवस मुंबई बाहेर जाऊ नका अशा सूचना भाजपकडून नवनिर्वाचित नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी आठ ते दहा दिवस लागणार आहेत. त्यामुळे कोणीच मुंबईबाहेर जाऊ नका अशा सूचना भाजपच्या नगरसेवकांना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, महापौरपदाचं आरक्षण जाहीर झाल्यावर भाजप सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Mumbai Mayor Election : पडद्यामागे ठाकरे गटासोबत भाजपची चर्चा?
मुंबई महापौरपदावरून ठाकरे-भाजपमध्ये बोलणी झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. मुंबई महापालिकेत 2017 सालाची भरपाई ठाकरे भाजपला करुन देणार असल्याची चर्चा आहे. 2017 साली ठाकरेंचा महापौर व्हावा म्हणून भाजपनं माघार घेतली होती. अशातच, महापौर निवडीवेळी ठाकरेंचे नगरसेवक गैरहजर राहणार असल्याची चर्चा सुरू आहे.
मुंबईत महापौर आपल्याच पक्षाचा व्हावा यासाठी शिंदेंची शिवसेना प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. अशात, ठाकरेंचे 65 नगरसेवक महापौर निवडीवेळी गैरहजर राहून भाजपला मदत करु शकतात अशी चर्चादेखील रंगली आहे. महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना गैरहजर राहिल्यास ती निवडणूक बिनविरोध होईल.
मुंबई महापालिकेचा अंतिम निकाल-(BMC Election Result 2026)
भाजप - 89
शिवसेना - 29
शिवसेना ठाकरे गट - 65
काँग्रेस - 24
मनसे - 6
एमआयएम- 8
एनसीपी - 3
एसपी - 2
एनसीपी शप - 1---एकूण- 227
ही बातमी वाचा:
