Marathwada election result live 2026: मराठवाड्यात सत्ता कुणाची? छत्रपती संभाजीनगरसह नांदेड, परभणी, जालना, लातूर महानगरपालिकांचा निकाल एकाच क्लीकवर
प्रभाग पद्धतीने होत असलेल्या या निवडणुकीत प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडले जाणार असल्याने राजकीय गणितं अधिक गुंतागुंतीची झाली आहेत.
पार्श्वभूमी
Marathwada election result live 2026: राज्यातील 29 महापालिकांसाठी झालेल्या मतदानानंतर राजकीय वातावरण तापलं असून, निकालांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मतदान केंद्रांवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. (Muncipal Corporation...More
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. केवळ सहा जागा मिळाल्या आहेत. याच मुद्यावरुन ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवेंवर टीका केलीय. अंबादास अखेरचे पाच दिवस कुठे होता? याबाबत काहीच माहित नाही. स्वतःच प्लॅन करायचा, आम्हाला काहीच करुन देत नव्हता, अशी टीका खैरे यांनी केली आहे.
कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांचे विश्वासू गजानन पाटील यांचा पत्नी मीनल पाटील यांचा नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत विजय झाला आहे मीनल पाटील या शिवसेने कडून इच्छुक होत्या त्यांची उमेदवारी आमदार बालाजी कल्याणकर यांनी कापली होती त्यानंतर बंड करत अपक्ष राहण्याचा निर्णय घेतला होता त्यांचा प्रचार देखील शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील बाबुराव कदम कोहोळीकर यांनी केला होता त्यांचा विजया मुळे आमदार कल्याणकर यांना मोठा धक्का बसला आहे
नांदेड महानगरपालिकेमध्ये भाजपने 45 जागावर विजय मिळवत एक हाती सत्ता काबीज केली आहे पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांनी नांदेड शहरांमधील वर्चस्व सिद्ध केल्याने नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचे बॅनर लागले असून त्या बॅनरवर राजकारणाच्या आखाड्यातील वस्ताद मालक असे आशयाचे हे बॅनर लागले आहे
छत्रपती संभाजीनगर शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे TT पॉइंटर्स
- छत्रपती संभाजीनगर मध्ये अनेक शिवसेनेचे पदाधिकारी शिंदे गटात आणि भाजपामध्ये गेले त्यांना घेण्यात आले
- इथे आमचे खासदार आमदार नाही यात सुद्धा सहा जागेवर विजय झाला
- पक्षाकडे पैसा नव्हता लोकांकडे पैसा नव्हता मात्र आम्ही प्रामाणिक निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा
- आमचे पदाधिकारी नसल्याने जागा कमी मिळाल्या
- आम्ही परिस्थिती सुधारू
- परत पुढे जाऊ
- महाराष्ट्रात ठाकरे संपले म्हणणाऱ्याला एक थप्पड बसली आहे
- खरतर समजत नाही हे का व्हावं
- जी प्लॅनिंग पहिजे होती ती झालेली नाही म्हणून हा पराभव झाला अशी खंत खैरे यांनी व्यक्त केली
- दानवे त्यांच्या भावाला सुद्धा निवडून आणू शकले नाही
- आता आम्ही चिंतन मंथन करू
- आम्हाला वाटतं काहीतरी गडबड झाली आहे
- आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत
- मात्र काही जण सांगायचं नाही बोलायचं नाही अशी पद्धत पक्षात नाही
- पक्ष महत्त्वाचा होता
- पक्ष म्हणून एकत्र निवडणूक लढवायच्या हे झालेलं नाही
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मतमोजणीत एकूण ११५ पैकी आतापर्यंत १०२ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यावरून भाजप ५६ जागांवर आघाडीवर असून, महापालिकेत बहुमतासाठी स्पष्ट ताकद दाखवली आहे. एमआयएमने २४ जागांवर विजय मिळवून शहरातील राजकीय समीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शिवसेना १४ आणि शिवसेना (UBT) ६ जागांवर यशस्वी ठरली आहे. काँग्रेसला १, राष्ट्रवादी (SP) गटाला १ जागा मिळाली आहे. वंचित बहुजन आघाडीने ४ जागांवर आपली पकड कायम ठेवली आहे. इतर कोणत्याही उमेदवाराला आत्तापर्यंत विजय मिळालेला नाही. निकालावरून सत्तास्थापनेसाठी भाजपची ताकद स्पष्ट दिसत आहे.
जालना ब्रेकिंग,
पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरण आणि नाला सोपारा स्फ़ोटकाप्रकरणातील जामीनावर बाहेर असलेला संशयित आरोपी श्रीकांत पांगारकर विजयी...
जालना महानगरपालिका निवडणुकीत श्रीकांत पांगरकर हा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होता...
जालना महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 ड मधून 144 मतांनी विजयी...
माझ्यावरील आरोप न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ठ आहे, जनतेच्या न्यायालयामध्ये मला न्याय मिळाला असल्याची प्रतिक्रिया त्याने विजयानंतर दिली आहे...
बाईट: श्रीकांत पांगारकर अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक 13
लातूर महापालिका निवडणूक निकाल
विजयी उमेदवार
काँग्रेस + वंचित आघाडी : 47 (4 वंचित)
भाजप : 22
राष्ट्रवादी अजित पवार : 01
राष्ट्रवादी शरद पवार : 00
शिवसेना ठाकरे गट : 00
नांदेड महानगरपालिका निवडणुकीत भाजडपने आघाडी घेतल्याचं चित्र दिसत आहे. 16 जागांवर भाजप आत्तापर्यंत विजयी झालं आहे. तर काँग्रेसला 4, एमआयएमला 8 जागा मिळाल्या आहेत.
भाजप - 16
काँग्रेस - 4
राष्ट्रवादी (AP)-
राष्ट्रवादी (SP)-
शिवसेना -
शिवसेना (UBT)-
वंचित -
MIM-8
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत प्रभाग १७ मध्ये भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले. मात्र प्रभाग २५ मध्ये भाजपचे माजी महापौर भगवान घडामोडे पराभूत झाले. गुलमंडीतील प्रभाग १५ मध्ये उभाठा गटाच्या वैशाली कोरडे विजयी ठरल्या. शहरात एमआयएमचा प्रभाव वाढताना दिसत असून पक्षाचे दोन उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. तसेच चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे आणि आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा ऋषीकेश जैस्वाल यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर -
गरवारे स्टेडियम परिसरात उमेदवारांच्या विजयानंतर मोठा जल्लोष
- फटाके फोडत आणि रंग उधळत आनंदोत्सव साजरा
- मतमोजणी केंद्राबाहेर उमेदवारांकडून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
- कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.
- MIM च्या प्रभाग 9 मधील चारही विजयी उमेदवारांच्या विजयानंतर मोठा जल्लोष होत आहे.
संभाजीनगरमध्ये प्रभाग क्रमांक 17 भाजपचे 4 ही उमेदवार विजयी झाले आहेत, माजी महापौर भाजप उमेदवार भगवान घडामोडे पराभूत झाले असून प्रभाग क्रमांक 25 मध्ये शिवसेना उबाठाच्या वैशाली कोरडे विजयी झाल्या आहेत.
अंबादास दानवे यांचा भाऊ राजेंद्र दानवे यांचा पराभव, प्रभाग क्रमांक 16
अंबादास दानवे यांचा भाऊ राजेंद्र दानवे यांचा पराभव, प्रभाग क्रमांक 16
भाजपच्या रामेश्वर भादवे यांचा विजय
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत राजकीय घराण्यांचा प्रभाव ठळकपणे दिसून आला आहे. प्रभाग क्रमांक १५ मधून आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा ऋषीकेश जैस्वाल आघाडीवर आहे.
दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्यासाठी ही निवडणूक निर्णायक ठरली. त्यांची मुलगी हर्षदा शिरसाठ प्रभाग क्रमांक १८ मधून तर मुलगा सिद्धांत शिरसाठ प्रभाग क्रमांक २९ मधून विजयी झाला आहे.
या निकालांमुळे शिरसाठ गटाची महापालिकेतील ताकद वाढली असून, शिंदे गटाच्या सत्तास्थापनाच्या दृष्टीने हे निकाल महत्त्वाचे मानले जात आहेत.
लातूर: राज्यभरात भाजपची लाट असताना लातूरमध्ये काँग्रेसची मुसंडी
विलासरावांच्या आठवणी लातूरकरांनी मतपेटीतून जागवल्या
काँग्रेस वंचित आघाडीची लातूर महापालिकेवर सत्ता
छत्रपती संभाजीनगर - गरवारे स्टेडियम परिसरातील गोंधळानंतर प्रशासनाकडून ड्रोनने टेहाळणी
- गरवारे मतमोजणी केंद्रावरील एन्ट्री गेटवर गोंधळ झाला होता.
- तर लाठीचार्जच्या अफवेने परिसरात गोंधळ उडाला होता
- यानंतर प्रशासनाने आता ड्रोन सोडले असुन ड्रोनच्या माध्यमातून टेहाळणी केली जात आहे.
- संपुर्ण परिसरावर प्रशासनाची ड्रोनच्या माध्यमातून करडी नजर असल्याचं पाहायला मिळत आहे
राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना युती आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी काँग्रेस आणिराष्ट्रवादी आघाडीवर असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, लातूरमध्ये काँग्रेसने जोरदार मुंसडी घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. लातूर महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं बहुमताचा आकडा गाठला आहे. काँग्रेस आणि वंचितच्या युतीला लातूर पालिकेत 37 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला 14 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं लातूर महानगरपालिकेत काँग्रेसचा महापौर होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मतमोजणीत राजकीय चित्र अधिक स्पष्ट होत चालले आहे. एकूण ११५ जागांपैकी आतापर्यंत ६५ जागांचे निकाल जाहीर झाले असून, या टप्प्यावर भाजप सर्वाधिक २३ जागांवर आघाडीवर आहे. भाजपने शहरातील अनेक प्रभागांमध्ये दमदार कामगिरी करत सत्तास्थापनेच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे.
शिवसेना १६ जागांवर आघाडीवर असून, शहरातील काही पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये पक्षाने आपली ताकद कायम ठेवली आहे. मात्र शिवसेना (UBT) गटाला आतापर्यंत केवळ ४ जागांवर यश मिळालं आहे. दुसरीकडे, एमआयएमने १५ जागांवर आघाडी घेत शहरातील राजकीय समीकरणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. वंचित बहुजन आघाडीने ४ जागांवर विजय मिळवत आपली उपस्थिती जाणवून दिलीय. काँग्रेसला आतापर्यंत २ जागा मिळाल्या असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी (SP) या दोन्ही पक्षांना अद्याप एकही जागा मिळालेली नाही. इतर उमेदवारांनी १ जागा जिंकली आहे.
मतमोजणी अद्याप सुरू असून, उर्वरित जागांचे निकाल येणं बाकी आहे. सध्याच्या आकड्यांवरून महापालिकेत स्पष्ट बहुमत कोणाला मिळणार याबाबत अजूनही उत्सुकता कायम असून, अंतिम निकालानंतरच सत्तास्थापनेचे चित्र स्पष्ट होणार आहे.
छत्रपती संभाजी नगर : प्रभाग क्रमांक 23 मधून भाजपचे 4 ही उमेदवार विजयी
भाजपचे प्रमोद राठोड विजयी
भाजपच्या सत्यभामा शिंदे
भाजपचे बाळासाहेब मुंडे
भाजपाच्या सुरेखा गायकवाड
वंचित बहुजन आघाडीचा लातूरमध्ये मास्टर स्ट्रोक....
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस यांनी एकत्रित ही निवडणूक लढवली....
पासून ठिकाणी काँग्रेस आणि पाच ठिकाणी वंचित बहुजन आघाडी....
पाच पैकी पाच जागा जिंकत वंचित न शंभर टक्के यश मिळवला आहे
लातूर महानगर पालिका निवडणूक
एकूण प्रभाग 18 - जागा 70
भाजपा - 14
काँग्रेस 37 (यात पाच जागा वंचितांच्या आहेत )
वंचित बहुजन आघाडी 05
राष्ट्रवादी अजित पवार गट -
राष्ट्रवादी शरद पवार गट -
शिवसेना शिंदे -
शिवसेना ठाकरे -
MIM -
लातूर महानगर पालिका निवडणूक
एकूण प्रभाग 18 - जागा 70
भाजपा - 14
काँग्रेस 37 (यात पाच जागा वंचितांच्या आहेत )
वंचित बहुजन आघाडी 05
राष्ट्रवादी अजित पवार गट -
राष्ट्रवादी शरद पवार गट -
शिवसेना शिंदे -
शिवसेना ठाकरे -
MIM -
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मतमोजणीत पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या कुटुंबाची घोडदौड स्पष्ट दिसून येत आहे. संजय शिरसाठ यांचा मुलगा सिद्धांत शिरसाठ प्रभाग क्रमांक २९ मधून विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
त्याचप्रमाणे, संजय शिरसाठ यांची मुलगी हर्षदा शिरसाठ प्रभाग क्रमांक १८ मधूनही विजयाच्या उंबरठ्यावर आहे. सध्या सुरू असलेल्या मतमोजणीत दोन्ही प्रभागांमध्ये शिरसाठ यांची आघाडी भक्कम असून, पालकमंत्र्याची दोन्ही मुलं विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं चित्र आहे.
मतमोजणी अंतिम टप्प्यात असताना, या दोन्ही जागांवरून शिरसाठ कुटुंबाचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मतमोजणीत आतापर्यंत ११५ पैकी ६६ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या आकड्यांवरून भाजप २१ जागांवर आघाडीवर असून, सत्तास्थापनेसाठी पक्षाची स्थिती बळकट दिसत आहे.
शिवसेना १५ जागांवर यश मिळवली आहे, तर शिवसेना (UBT) गटाला ६ जागांवर विजय मिळाला आहे. एमआयएमने १२ जागांवर आपली ताकद कायम ठेवली असून, शहरातील राजकीय समीकरणावर त्यांचा प्रभाव स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसला ४, राष्ट्रवादीला २, राष्ट्रवादी (SP) गटाला १ जागा मिळाली आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीने ४ जागांवर आपली पकड ठाम ठेवली आहे, तर इतर उमेदवाराला १ जागा मिळाली आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मतमोजणीत आतापर्यंत ११५ पैकी ६० जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. सुरुवातीच्या आकड्यांवरून भाजप १८ जागांवर आघाडीवर असून, सत्तास्थापनेच्या दृष्टीने पक्षाची स्थिती मजबूत दिसत आहे.
शिवसेना ११ जागांवर यश मिळवली आहे, तर शिवसेना (UBT) गटाला ७ जागांवर विजय मिळाला आहे. एमआयएमने १२ जागांवर जोरदार कामगिरी केली असून, शहरातील राजकीय समीकरणावर त्यांचा प्रभाव स्पष्ट होत आहे. काँग्रेसने ४, राष्ट्रवादी २, आणि राष्ट्रवादी (SP) गटाला १ जागा मिळाली आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीने ४ जागांवर आपली पकड ठाम राखली आहे, तर इतर उमेदवारांना १ जागा मिळाली आहे.
छत्रपती संभाजीनगर -
गरवारे स्टेडियम परिसरात लाठीचार्जच्या अफवेमुळे गोंधळ.
- गरवारे स्टेडियम मतमोजणी केंद्रावर सकाळपासून गोंधळ निर्माण झालेला आहे.
- आतमध्ये तब्बल एक ते दीड तासानंतर सुरळीत मतमोजणी सुरू झाली आहे.
- दरम्यान गरवारे परिसरात लाठीचार्ज होत असल्याच्या अफवेमुळे गोंधळ उडाला आहे.
- अनेकांनी लाठीचार्ज होत असल्याच्या भितीने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उड्या मारल्या.
छत्रपती संभाजीनगर मधील प्रभाग क्रमांक 18 मध्ये शिवसेनेच्या हर्षदा शिरसाट आघाडीवर
क्रमांक 18 मधून भाजपचे संजय बारवाल आघाडीवर
प्रभाग क्रमांक 19 अ मधून उद्धव ठाकरे सेनेचे रणजित दाभाडे आघाडीवर
प्रभाग क्रमांक 19 ब शिवसेना उद्धव ठाकरेच्या स्वाती रत्नपारखी आघाडीवर
प्रभाग २० अ मधून भाजप जालिंदर शेंडगे
ब मधून भाजप अर्चना नीलकंठ
क मधून भाजप अनिता मानकापे आघाडीवर
ड मधून शिंदे सेनेचे माजी महापौर त्र्यंबक तुपे आघाडीवर
छत्रपती संभाजीनगर मधील प्रभाग क्रमांक 18 मध्ये शिवसेनेच्या हर्षदा शिरसाट आघाडीवर
क्रमांक 18 मधून भाजपचे संजय बारवाल आघाडीवर
प्रभाग क्रमांक 19 अ मधून उद्धव ठाकरे सेनेचे रणजित दाभाडे आघाडीवर
प्रभाग क्रमांक 19 ब शिवसेना उद्धव ठाकरेच्या स्वाती रत्नपारखी आघाडीवर
प्रभाग 20 अ मधून भाजपचे जालिंदर शेंडगे आघाडीवर
ब मधून भाजप अर्चना नीलकंठ आघाडीवर
क मधून भाजप अनिता मानकापे आघाडीवर
ड मधून शिंदे सेनेचे माजी महापौर त्र्यंबक तुपे आघाडीवर
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मतमोजणीत प्रभाग क्रमांक 23 मध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. या प्रभागात पक्षाची आघाडी स्पष्ट दिसून येत असून, राजकीय गणित बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
त्याचप्रमाणे, प्रभाग क्रमांक 29 मध्ये शिवसेनेचे 3 उमेदवार प्रचंड मतांनी आघाडीवर आहेत. या प्रभागात पक्षाचा प्रभुत्व स्पष्ट दिसत असून, मतदारांचा पाठिंबा महत्त्वपूर्ण ठरत आहे.
मतमोजणी अजूनही सुरू असून, अंतिम निकालानंतर महापालिकेतील सत्तास्थापनेचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मतमोजणीत ११५ पैकी आतापर्यंत ४५ जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. या आधीच्या आकड्यांप्रमाणे, भाजप १५ जागांवर आघाडीवर आहे. शिवसेना ९ जागांवर, तर शिवसेना (UBT) गटाला ६ जागांवर यश मिळाले आहे.
एमआयएमने ८ जागांवर विजय मिळवला असून, काँग्रेसने ३ जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला २, तर राष्ट्रवादी (SP) गटाला १ जागा मिळाली आहे. इतर उमेदवारांनी १ जागा जिंकली आहे.
सुरुवातीच्या आकड्यांवरून स्पष्ट होत आहे की, भाजप शहरातील बऱ्यापैकी प्रभागांवर आघाडीवर असून, इतर पक्षांसाठी सत्तास्थापनेचं गणित गुंतागुंतीचं ठरत आहे. मतमोजणी अजूनही सुरू असून, उर्वरित जागांचे निकाल येताच अंतिम चित्र स्पष्ट होईल.
Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation election results : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणचे कल हाती येत आहेत. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकांचे कल देखील हाती आले आहेत. एकूण 115 जागांपैकी आतापर्यंत 33 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. भाजपने 12 जागांवर विजय मिळवला असून, सत्तास्थापनेच्या दृष्टीने पक्षाची स्थिती भक्कम होताना दिसत आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील मतमोजणी केंद्राबाहेर पोलिसांनी सुरक्षिततेसाठी मोठा बंदबस्त लावला आहे. तसेच परिसरात ड्रोन कॅमेर्याद्वारे पेट्रोलिंग करत, सार्वजनिक घोषणाही केल्या जात आहेत, जेणेकरून मतमोजणी सुरळीत पार पडू शकेल आणि कोणताही गोंधळ टाळता येईल.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मतमोजणीत शिरसाठ कुटुंबाचा दबदबा जाणवतोय माजी नगरसेवक संजय शिरसाठ यांची मुलगी हर्षदा शिरसाठ प्रभाग १८ मधून आघाडीवर असून, मुलगा सिद्धांत शिरसाठ प्रभाग २९ मध्ये पुढे आहे.
दोघींची आघाडी या प्रभागांमध्ये पक्षासाठी मोठा प्लस पॉइंट ठरत आहे. मतमोजणी सुरू असून, समर्थकांचा उत्साह केंद्रांवर पाहायला मिळत आहे. या आघाडीमुळे शहरातील राजकीय गणित अधिक गुंतागुंतीचे झाले आहे, आणि अंतिम निकालानंतर महापालिकेत सत्तास्थापनेचे स्वरूप स्पष्ट होणार आहे.
वरळी
प्रभाग १९४
ठाकरेंच्या शिवसेनेंचे निशिकांत शिंदे १७० मतांनी आघाडीवर :
ठाकरेंची शिवसेना - निशिकांत शिंदे 2399
शिंदेंची शिवसेना - समाधान सदा सरवणकर - 2229
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या मतमोजणीत सुरुवातीचे कल स्पष्ट होत असून राजकीय समीकरणांची दिशा दिसू लागली आहे. एकूण ११५ जागांपैकी आतापर्यंत ३३ जागांचे निकाल जाहीर झाले असून, भाजप सर्वाधिक जागांवर आघाडीवर असल्याचं चित्र आहे. भाजपने १२ जागांवर विजय मिळवला असून, सत्तास्थापनेच्या दृष्टीने पक्षाची स्थिती भक्कम होताना दिसत आहे.
शिवसेनेने आतापर्यंत ६ जागा जिंकल्या आहेत, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला ५ जागांवर यश मिळालं आहे. एमआयएमनेही ५ जागांवर विजय मिळवत शहरातील आपली ताकद कायम ठेवली आहे. काँग्रेसने ३ जागांवर समाधानकारक कामगिरी केली असून, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही पक्षांना प्रत्येकी १ जागा मिळाली आहे.
दरम्यान, काही जागांवर अपक्ष आणि इतर उमेदवारांनीही आघाडी घेतल्याचं पाहायला मिळत आहे. मतमोजणी अजूनही सुरू असून उर्वरित जागांचे निकाल येणं बाकी आहे. सुरुवातीच्या कलांमुळे शहरातील राजकीय वातावरण तापलं असून, कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
संभाजी नगर संजय शिरसाठ यांची मुलगी हर्षदा प्रभाग क्रमांक 18 मधून आघाडीवर तर मुलगा सिद्धांत शिरसाठही प्रभाग 29 मधून आघाडीवर
छत्रपती संभाजीनगर - गरवारे स्टेडियम वरील मतमोजणी केंद्रावरील गोंधळ कायम
प्रशासनाचे कोणतेही नियोजन नसल्याने उमेदवार प्रतिनिधींची गर्दी
सकाळी 9 वाजल्यापासून सुरू असलेला गोंधळ अद्याप कायम
निवडणूक निरिक्षक मतमोजणी केंद्रावर दाखल
उमेदवारांनी मांडली कैफियत
छत्रपती संभाजीनगरमधील गरवारे मतदान केंद्रावर आज प्रचंड गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. मोठ्या संख्येने मतदार अचानक पद्धतीने मतदान केंद्रात घुसल्याने परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मतदान केंद्राच्या आत बसण्यासाठी पुरेशी जागा नसल्यामुळे काही उमेदवारांना बाहेर येण्यास भाग पाडलं गेलं.. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासन आणि पोलिसांकडून गर्दी आवरण्याचे प्रयत्न सुरू होते.
छत्रपती संभाजी नगर निकाल
115/ 16
भाजप 4
शिवसेना 3
शिवसेना UBT 3
एमआयएम 5
काँग्रेस1
राष्ट्रवादी 00
राष्ट्रवादी SP 00
इतर
छत्रपती संभाजी नगर निकाल
115/ 17
भाजप : 6
शिवसेना : 3
शिवसेना UBT : 3
एमआयएम : 4
काँग्रेस : 1
राष्ट्रवादी 00
राष्ट्रवादी SP 00
इतर
लातूरमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर लोकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. लातूरची जनता कोणाच्या परड्यात सत्तेच्या चाव्या टाकणार हे थोडयाच वेळात समजणार आहे.
भाजप + शिवसेना२०
(भाजप १२+ शिवसेना ८)
ठाकरे बंधू १६
( शिवसेना ठाकरे गट 12 + मनसे 4)
काँग्रेस -५
अपक्ष - ५
छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग
- मतमोजणी कक्षात प्रवेश करण्यासाठी उमेदवार प्रतिनिधींचा गदारोळ
- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेसाठी गरवारे स्टेडियम परिसरात थोड्याच वेळात मतमोजणीला सुरवात होईल
- पोलिस उमेदवार प्रतिनिधी मध्ये शाब्दिक वाद
- एकाच वेळी सर्व उमेदवार प्रतिनिधी प्रवेशद्वारावर आल्याने गोंधळ
Amit Deshmukh Latur Mahanagar Palika election : निवडणुकीत विलासराव देशमुख यांच्या बद्दल बोलणं दुर्दैवी होतं. त्यामुळे सामान्य माणसांच्या भावना दुखावल्या गेल्याचे मत काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केले. रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याबाबत केलेलं वक्तव्य चुकीचं होतं असे देशमुख म्हणाले. लातूरच्या अस्मितेवर घाव घालण्याचा प्रयत्न जेव्हा होतो तेव्हा स्थानिक अस्मिता उफाळून येते असेही देशमुख म्हणाले. सत्तेचा अहंकार डोक्यात असेल तर ते लोकांनी स्वीकारलं नाही, मलाही ते जाणवलं , निकालात ते दिसेल असे देशमुख म्हणाले. रवींद्र चव्हाण यांच्या विलासराव देशमुख यांच्या बद्दलच्या वक्तव्यावर अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. लातूरमध्ये काँग्रेस-वंचित आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल असा विश्वास अमित देशमुखांनी व्यक्त केला.
छत्रपती संभाजी नगर मध्ये असणाऱ्या शासकीय इंजीनियरिंग कॉलेजमध्ये उमेदवाराच्या प्रतिनिधीला आत मध्ये येण्यावरून पोलिसांमध्ये वाद झाला यावरून पोलिसांनी उमेदवारांच्या प्रतिनिधीला लाठीचार्ज केला , मतदान केंद्रावरती मोठा राडा
विकास जैन असं शिवसेनेच्या कार्यकर्त्याचं नाव त्यास मारहाण करण्यात आलं पोलिसांकडून
छत्रपती संभाजी नगर मध्ये असणाऱ्या शासकीय इंजीनियरिंग कॉलेजमध्ये उमेदवाराच्या प्रतिनिधीला आत मध्ये येण्यावरून पोलिसांमध्ये वाद झाला यावरून पोलिसांनी उमेदवारांच्या प्रतिनिधीला लाठीचार्ज केला , मतदान केंद्रावरती मोठा राडा
जालना महानगरपालिका मतमोजणी.
जालन्यातील एमआयडीसी फेस थ्री येथे सकाळी जालना महानगरपालिकेच्या मतमोजणीला सुरवात होईल.
एकूण 65 जागांसाठी 454 उमेदवारांचं नगरसेवक पदाचे राजकीय भविष्य उघड होणार आहे.. याशिवाय जालना महानगरपालिकेवर कोणाची सत्ता येईल हे देखील स्पष्ट होईल.. साधारण 2 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे.
निवडणुकीत विलासराव यांच्या बद्दल बोलणं दुर्दैवी होतं त्यामुळे सामान्य माणसांच्या भावना दुखावल्या गेल्या
लातूरच्या अस्मितेवर घाव घालण्याचा प्रयत्न जेव्हा होतो तेव्हा स्थानिक अस्मिता उफाळून येते
सत्तेचा अहंकार डोक्यात असेल तर ते लोकांनी स्वीकारलं नाही, मलाही ते जाणवलं , निकालात ते दिसेल
प्रश्न: रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला ?,
.... मात्र ते वक्तव्य चुकलंच
रवींद्र चव्हाण यांच्या विलासराव देशमुख यांच्या बद्दलच्या वक्तव्यावर अमित देशमुख यांची प्रतिक्रिया
बाळासाहेब आंबेडकर राहुल गांधी एकत्र येण्याला ही निवडणूक निमित्त, या निवडणुकीत यश मिळालं तर नवा पर्याय उभा राहण्यासाठी सुरुवात होईल
काँग्रेस आणि वंचित बहुजन विकास आघाडी ही एक चाचणी
काँग्रेसला रोखण्यासाठी लातूरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी वेगळी लढणार याची कल्पना होती
लातूर महानगरपालिकेतील भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिरंगी लढतीवर अमित देशमुख यांच वक्तव्य
काँग्रेस वंचित आघाडीला लातूर महानगरपालिकेत स्पष्ट बहुमत मिळेल अमित देशमुख यांनी व्यक्त केला विश्वास
काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी आप्पासाहेब शेळके यांनी
Tictak: अमित देशमुख, आमदार काँग्रेस
४११ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार
परभणी शहर महानगरपालिकेसाठी काल 65.99% एवढे मतदान झालेल आहे 411 उमेदवारांचे भवितव्य हे मतदान आज ठरवणार आहे मतदानाची पूर्ण तयारी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाच सभागृहामध्ये करण्यात आलेली आहे आणि काही वेळामध्ये मतमोजणीला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी पूर्ण तयारी जी आहे ती पूर्ण झाली आणि या 411 उमेदवारांपैकी कोण बाजी मारते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे
- मुख्यपृष्ठ
- निवडणूक
- Marathwada election result live 2026: मराठवाड्यात सत्ता कुणाची? छत्रपती संभाजीनगरसह नांदेड, परभणी, जालना, लातूर महानगरपालिकांचा निकाल एकाच क्लीकवर