Vidhansabha Election Political News : विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी वरीष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुंबईतील सागर निवासस्थानी भेटायला येणाऱ्या नेत्यांची मोठी गर्दी पाहयला मिळत आहे. नाराज, बंडखोर आणि इच्छुक उमेदवारांनी सकाळपासूनच सागर बंगल्यावर रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 


सकाळपासून देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी कोण कोण आले?


खडकवासला मतदारसंघातील विद्यामान आमदार भीमराव तापकीर यांच्या उमेदवारीला अनेकांनी विरोध केला आहे. या मतदारसंघातील इच्छुक माजी नगरसेवक नागपुरे आणि समर्थकांनी घेतली फडणवीसांची भेट 


पुणे कंन्टोनमेंटमधून सुनील कांबळेंना वेटिंगवर ठेवल्याने माजी नगरसेवक भरत वैरागे यांच्याकडून उमेदवारीची मागणी करण्यात आली आहे.  


आर्वीचे आमदार दादाराव केचे यांना देखील वेटिंगवर ठेवल्याने ते वेगळ्या विचारात आहेत. अशातच सुमित वानखेडेंना उमेदवारीची शक्यता, केचे नाराज असल्याने वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत 


धनंजय महाडिक आपल्या पुत्रासाठी कृष्णराजसाठी उमेदवारीची मागणी केली आहे. उमेदवार अदलाबदल करण्यासंदर्भात त्यांनी भेट घेतली आहे. कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळं कृष्णराज कोल्हापूर उत्तर म्हणून इच्छुक आहेत. 


राज पुरोहित कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत. मात्र फडणवीस यांच्या भेटीनंतर नाराजी दूर, भेट सकारात्मक झाल्याची माहिती.


शिवसेनेचे शिंदे गटाकडून इच्छुक असलेले तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत सागर बंगल्यावर, सोलापूर शहर मध्य मधून भाजपकडून मदत मिळावी यासाठी फडणवीस यांच्या भेटीला 


पुण्यातील नाराज माजी खासदार संजय काकडे यांनी देखील आज फडणवीस यांची भेट घेतली. काकडे तुतारी हाती घेणार अशी चर्चा होती. मात्र काकडेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न.


बीड जिल्ह्यातील देवराई आणि आष्टी मतदारसंघात अदलाबदल करण्यात यावी यासाठी माजी विधान परिषद आमदार सुरेश धस आष्टीतून इच्छूक आहेत.  


राम सातपुतेंचे पहिल्या यादीत नाव नाही, लोकसभेत पराभव झाल्यानंतर पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी, माळशिरसमधून विद्यमान आमदार सातपुते पुन्हा इच्छुक. 


वडगाव शेरी मतदारसंघातून टिंगरेंना पोर्शे अपघातामुळे महायुतीचा विरोध, भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक इच्छुक आहेत.


दौंड मतदारसंघातील माजी आमदार राहुल कुल यांना उमेदवारी जाहीर, मात्र अजित पवार गटाचे रमेश थोरात बंडखोरीच्या तयारीत, महायुतीतील बंडखोरीची शमविण्यासाठी कुल सागर बंगल्यावर. 


माजी गृहमंत्री रणजित पाटील अकोट मतदारसंघातून इच्छुक, भाजपचे विद्यामान आमदार प्रकाश भारसाकळेंना पहिल्या यादीत वेटिंगवर ठेवल्याने इच्छुकांची गर्दी वाढली. 


पहिल्या यादीत नाव जाहीर झाल्यानंतर अतुल सावे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट. 


राष्ट्रवादी कांग्रेसचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट, नवघरे हिंगोली जिल्ह्यातील वसमत मतदारसंघाचे विद्यामान आमदार.


विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सागर निवासस्थानी दाखल, थोड्याच वेळापूर्वी भाजपचे नाराज माजी आमदार राज पुरोहित यांनी भेट घेतली आहे. राज पुरोहित हे नार्वेकर यांच्या विरोधात बंडखोरीच्या तयारीत होते.


उमरखेड मतदारसंघातून विद्यमान नामदेव ससाणे हे भाजप आमदार, मात्र पहिल्या यादीत नाव नसल्याने इच्छुक भाविक भगत हे फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल


महत्वाच्या बातम्या:


राम सातपुतेंची धाकधूक वाढली! माळशिरसमधून तिकीट मिळणार की नाही? फडणवीसांच्या भेटीसाठी थेट सागर बंगल्यावर