Malegaon Voting 2026 : बोगस मतदानाचा सूळसुळाट? मालेगावात आढळले एकाच ठिकाणी 200 पेक्षा जास्त मतदान कार्ड
Malegaon Voting 2026 : मालेगावात (Malegaon Municipal Corporation) एकाच ठिकाणी 800 पेक्षा जास्त मतदान कार्ड (Voter ID Cards) सापडल्याची घटना घडलीय.

Malegaon Voting 2026 : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज (15 जानेवारी) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. अशातच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगावात (Malegaon Municipal Corporation) एकाच ठिकाणी 200 पेक्षा जास्त मतदान कार्ड (Voter ID Cards) सापडल्याची घटना घडलीय. इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान कार्ड सापडून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शिवाय हे मतदान कार्ड बोगस असल्याचा संशय देखील बळावला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, मतदान केंद्राला लागूनच एका घरात हे मतदान कार्ड सापडले आहे. दरम्यान, मतदान कार्डवर संशय आल्यावर प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली असून याबाबत अधिक तपास सुरु करण्यात आला आहे. कार्ड जप्त करून पंचनामा सुरू करण्यात आला असून या कार्ड संदर्भात निवडणूक अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. तर या मतदार कार्डचा उमेदवाराकडून जागेवरच पंचनामा करण्याची मागणी करण्यात येत आहे.
Malegaon Election 2026: मालेगावातील 'बडी हायस्कूल ' येथे दोन प्रभागातील ४० मतदान केंद्र, मतदारांची धावपळ
दुसरीकडे, मालेगाव महापालिकेसाठी आज मतदान होत आहे. मालेगाव पूर्व भागातील बडी हायस्कूल येथे प्रभाग क्रमांक 15 व 17 मधील तब्बल 30 ते 40 मतदान केंद्र आहेत. त्यामुळे मतदारांना केंद्र शोधण्यास अडचण निर्माण होत आहे. यावर मार्ग म्हणून शहरातील काही तरुणांनी आपल्या हाताने या मतदान केंद्राचा नकाशा तयार करत येणाऱ्या प्रत्येक मतदाराची मदत करत त्यांना मतदान केंद्र शोधून देत आहे.
मतदारयादीत घोळ असल्याने मतदानाची टक्केवारी कमी : आसिफ शेख (Asif Shaikh)
मालेगाव महानगरपालिका निवडणूक मतदार यादीत मोठा घोळ असल्याने मतदानाची टक्केवारी कमी होत आहे. या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मात्र मालेगावकर जनतेने मतदानाची टक्केवारी वाढवावी असे आवाहन इस्लाम पार्टीचे माजी आमदार आसिफ शेख यांनी केले. मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी इस्लाम पार्टीने समाजवादी पार्टीसोबत युती करत 'मालेगाव सेक्युलर फ्रंट' नावाने निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत मालेगाव सेक्युलर फ्रंटला नक्कीच बहुमत मिळेल आणि जर आमच्या अटी शर्ती जातीवादी पक्षसोडून इतर पक्षाला मान्य असतील तर त्यांना आमच्या सोबत घेऊ , अशी प्रतिक्रिया माजी आमदार आसिफ शेख यांनी दिली.
Dada Bhuse : मंत्री दादा भुसे यांनी बजावला कुटुंबासह मतदानाचा हक्क
मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आज मालेगावच्या सोयगाव भागातील शुभदा विद्यालयातील मतदान केंद्रावर आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मंत्री भुसे यांच्या पत्नी दोन्ही मुले, सुना आदींनी सोबतच मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. ही निवडणूक जनतेनेच हाती घेतली होती. मतदारांकडून मिळालेल्या भरभरून प्रतिसादाच्या जोरावर आपला विजयी निश्चित होणार असल्याचा विश्वास देखील दादा भुसे यांनी व्यक्त करतांनाच मंत्री भुसे यांनी मतदार राजाला भरभरून मतदान करण्याचे आवाहन केले.
आणखी वाचा



















