नाशिक :नाशिक जिल्ह्यातील मालेगाव महापालिका निवडणुकीत इस्लाम पक्षानं वर्चस्व मिळवलं आहे. इस्लाम पक्षानं मालेगाव महापालिका निवडणुकीत 35 जागांवर विजय मिळवला आहे. या पक्षानं समाजवादी पक्षानं 6 जागा मिळवला आहे. मालेगाव महापालिकेची सदस्यसंख्या 81 इतकी आहे. मालेगावात इस्लाम पक्ष आणि समाजवादी पक्षानं मालेगाव सेक्युलर फ्रंट या नावानं आघाडी केली होती. या आघाडीचा महापौर मालेगाव महानगरपालिकेत होऊ शकतो.
मालेगाव महानगरपालिकेत पूर्व भागात 62 जागा आहेत. या सर्व जागा इस्लाम पक्ष आणि एमआयएम यांच्यात प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात इस्लाम पक्षानं बाजी मारली आहे. त्यांच्या 35 जागा विजयी झाल्या. एमआयएमनं 20 जागांवर विजय मिळवला आहे. मालेगाव पश्चिममध्ये शिवसेना आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेनेनं मालेगाव पश्चिममध्ये 18 जागांवर विजय मिळवला तर भाजपनं 2 जागांवर विजय मिळवला आहे.
इस्लाम पक्षाचा महापौर होणार?
मालेगावात ' इस्लाम ' पार्टी सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. इस्लाम पक्षानं 35 जागा मिळवल्या आहेत. शिवसेनेने 18 जागांवर विजय मिळवला असून तर भाजपला 2 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. भाजपची अंतर्गत गटबाजी त्यांच्या अपयशाला कारणीभूत ठरली. इस्लाम पार्टी व समाजवादी पक्षाचा महापौर मालेगावमध्ये होणार आहे.
मालेगाव महापालिका निवडणुकीतील पूर्व भागात मालेगाव सेक्युलर फ्रंट मधील ' इस्लाम ' पार्टीने 35 व समाजवादी पार्टीने 6 जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले..तर पश्चिम भागात शिवसेनेने ( शिंदे गट ) 18 जागा मिळवत आपला करिष्मा कायम ठेवला. माजी आमदार आसिफ शेख यांच्याकडून प्रथमच महापालिका निवडणुकीत इस्लाम पक्षाला निवडणुकीत उतरवण्यात आलं होतं. या पक्षानं 35 जागा जिंकल्यानं त्यांचा मालेगावात महापौर बसवण्याचा मार्ग मोकळा झाला. आहे. समाजवादी पार्टी व शिवसेना ( शिंदे गट ) पक्षाचा पाठिंबा घेत सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे.
