एक्स्प्लोर

Malegaon Mayor Election 2026: ...तर मालेगावात शिवसेनेचा महापौर बसणार; दादा भुसे, मौलाना मुफ्तींच्या भेटीने राजकारण ढवळलं, नेमकं काय घडलं?

Malegaon Mayor Election 2026: मालेगाव महापालिका महापौर व उपमहापौर पद निवडीसाठी उद्या महापालिका सभागृहात विशेष सभा पार पडणार आहे. मात्र, या सभेपूर्वीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Malegaon Mayor Election 2026: मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीसाठी उद्या महापालिका सभागृहात विशेष सभा पार पडणार असून, त्याआधीच शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते व मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) आणि एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल (Maulana Mufti Mohammad Ismail) यांच्यात झालेल्या भेटीमुळे मालेगावच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

या भेटीनंतर महापौरपदासाठीची समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात असून, महापालिका सभागृहातील उपस्थित नगरसेवकांचा आकडाच अखेर महापौरपदाचा फैसला करणार आहे. सध्या शिवसेना (शिंदे गट) कडे 18, तर एमआयएमकडे 21 नगरसेवक आहेत. महापौरपदासाठी आवश्यक असलेल्या जादुई आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही पक्षांना आणखी पाच नगरसेवकांची गरज आहे.

Malegaon Mayor Election 2026: ...तर शिवसेनेचा महापौर बसणार

दरम्यान, इस्लाम पार्टीकडे असलेल्या नगरसेवकांपैकी दोन नगरसेवक पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे असल्याने, त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. तसेच भाजपकडील दोन नगरसेवक कोणाची साथ देतात, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. जर हे चार नगरसेवक शिवसेना–एमआयएम आघाडीच्या पारड्यात पडले, तर शिवसेना (18), एमआयएम (21), भाजप (2) आणि इस्लाम पार्टीतील पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे दोन असे एकूण 43 संख्याबळ तयार होऊ शकते. अशा परिस्थितीत शिवसेनेचा महापौर आणि एमआयएमचा उपमहापौर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Malegaon Mayor Election 2026: भाजपचा एमआयएमसोबत जाण्यास स्पष्ट नकार

मात्र, या समीकरणात अडथळा ठरण्याची चिन्हेही आहेत. शिवसेनेकडून भाजपला सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव देण्यात आला असला, तरी भाजपने एमआयएमसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. एमआयएमसोबत कोणत्याही परिस्थितीत युती करणार नाही, असा पवित्रा भाजपने यापूर्वीही घेतलेला आहे.

Malegaon Mayor Election 2026: महापौर इस्लाम पार्टीचाच राहील: आसिफ शेख

दुसरीकडे, इस्लाम पार्टी, समाजवादी पार्टी आणि काँग्रेस या पक्षांचे एकत्रित संख्याबळ 43 इतके असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे महापौरपद इस्लाम पार्टीचेच राहील, असा ठाम विश्वास इस्लाम पार्टीचे माजी आमदार आसिफ शेख यांनी व्यक्त केला आहे. एकूणच, मालेगाव महापालिकेच्या महापौरपदासाठीची लढत अत्यंत अटीतटीची ठरणार असून, उद्याच्या विशेष सभेत नेमके कोणते राजकीय गणित जुळते, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Malegaon Election Result 2026: मालेगावातील पक्षीय बलाबल 

इस्लाम पार्टी : 35
एमआयएम : 21
शिवसेना : 18
समाजवादी पार्टी :5
काँग्रेस : 3
भाजप : 2

आणखी वाचा 

Girish Mahajan: गिरीश महाजन म्हणाले, भाजपला कुबड्यांची गरज नाही; आता शिंदे गटातील नेते संतापले, थेट उपमुख्यमंत्र्यांकडे जाणार, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Asiatic Society Election : मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
मुंबईतील ऐतिहासिक 'दि एशियाटिक सोसायटी'च्या बहुचर्चित निवडणुकीला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती; नेमकं कारण काय?
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Maharashtra Live Blog Updates: धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या अर्चना पाटलांचा विजय 
Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
BJP Vs Thackeray Camp: ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी चुकून (?) भाजप उमेदवाराच्या नावासमोर सही केली अन् सगळा गेम फिरला, मुंबई महानगरपालिकेच्या प्रभाग समितीच्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव
ठाकरे गटाच्या अनुभवी नगरसेवकांनी 'ती' एक घोडचूक केली अन् BMC प्रभाग समिती निवडणुकीत गेम फिरला, भाज
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
आखाती देशातील युद्धाचा फटका शेतकऱ्याच्या सिंचन साहित्याला; दरात 35 ते 40 टक्के वाढ
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
Embed widget