एक्स्प्लोर

Malegaon Election Results 2026: मालेगाव महापालिकेत इस्लाम पार्टीने सगळ्यांनाच झोपवलं, भाजप तोंडघशी आपटली; निवडणुकीतील 10 महत्वाचे मुद्दे

Malegaon Election Results 2026: मालेगाव महापालिका निवडणुकीतील पूर्व भागात मालेगाव सेक्युलर फ्रंट मधील 'इस्लाम' पार्टीने 35 व समाजवादी पार्टीने 6 जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले.

Malegaon Election Results 2026: मालेगाव महापालिका निवडणुकीतील पूर्व भागात मालेगाव सेक्युलर फ्रंट मधील 'इस्लाम' पार्टीने 35 व समाजवादी पार्टीने 6 जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. तर पश्चिम भागात शिवसेनेने (शिंदे गट) 18 जागा मिळवत आपला करिष्मा कायम ठेवला. माजी आमदार आसिफ शेख यांनी प्रथमच महापालिका निवडणुकीत लढलेल्या इस्लाम पक्षाचा मालेगावात महापौर बसवण्याचा मार्ग मोकळा झालाय. समाजवादी पार्टी व शिवसेना (शिंदे गट) पक्षाचा पाठिंबा घेत सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे.

या निवडणुकीत एमआयएम पक्षाला 20, काँग्रेसला 3 तर भाजपला 2 जागा मिळाल्या. महापालिकेतील माजी गटनेते सुनील गायकवाड, भाजपचे महानगर प्रमुख देवा पाटील यांना पराभव पत्करावा लागला. इस्लामच्या माजी महापौर ताहेरा शेख, शिंदे गटाचे माजी उपमहापौर नीलेश आहेर व नरेंद्र सोनवणे हे विजयी झाले आहेत. एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक यांना मात्र या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले. काँग्रेसचे महानगर प्रमुख एजाज बेग हे विजय झाले आहेत. शिवसेना (ठाकरे गट) राष्ट्रवादी (अजित पवार गट) राष्ट्रवादी (शरद पवार गट) वंचित आघाडी, आप, बसपा या पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही. महापालिकेच्या एकूण 84 जागांपैकी इस्लाम पक्षाची एक जागा बिनविरोध झाली होती. 

Malegaon Election Results 2026: भाजप तोंडघशी आपटली

मंत्री दादा भुसे यांनी महायुतीचा धर्म पाळत या निवडणुकीत युतीसाठी हात पुढे केला. मात्र भाजपमधील अंतर्गत गटबाजी व काही नव्या चेहऱ्यांनी यात युती न करण्याचा टोकाचा निर्णय घेतला खरा. मात्र, भाजपचा हा निर्णय चुकला आणि या निवडणुकीत सपाटून पराभव स्वीकारावा लागला. भाजपने 20 उमेदवार उभे केले होते. त्यातील 18 जणांना पराभव पत्करावा लागला आहे. 

Malegaon Election Results 2026: मालेगाव महापालिका निवडणुकीतील 10 महत्वाचे मुद्दे 

1. मालेगावी मंत्री दादा भुसे व माजी आमदार आसिफ शेख यांच्या विकासाला कौल. 

2. एमआयएमला चुकलेल्या उमेदवार निवडीचा फटका. 

3. राष्ट्रवादी (अजित पवार) , राष्ट्रवादी (शरद पवार) शिवसेना (ठाकरे गट), वंचित बहुजन आघाडी यांना या निवडणुकीत खातेही उघडता आले नाही. 

4. भाजपचे माजी महानगर अध्यक्ष व गटनेते यापूर्वी चार वेळा महापालिकेत निवडून गेलेले त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला..

5. मंत्री दादा भुसे यांचे कट्टर समर्थक युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वाघ यांचा पराभव.

6. शिवसेना - भाजप युती भाजप नेत्यांकडून फिस्कटवली गेली, अन् त्याचा फटका निवडणुकीत बसल्याने भाजप तोंडघशी पडली. केवळ 2 जागा मिळाल्या. 

7. माजी महापौर ताहेरा शेख व त्यांचे सुपुत्र इम्रान शेख यांचा या निवडणुकीत विजय झाला. 

8. या निवडणुकीत तीन दाम्पत्यांनी विजय मिळवला, समाजवादीचे नेते मुस्तकीम डीग्निटी व त्यांच्या पत्नी शान ए हिंद हे विजयी झाले. काँग्रेसचे इजाज बेग व त्यांच्या पत्नी यास्मिन बेग हे दांपत्य दुसऱ्यांदा सभागृहात पोहोचले. इस्लाम पार्टीचे खालीद शेख व त्यांच्या पत्नी नसरीन शेख हे देखील विजयी झाले..

9. एमआयएमचे आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांचे पुत्र हाफिज अब्दुल्ला यांचा मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजयी होत राजकारणात प्रवेश झाला. 

10. स्थानिक कार्यकर्त्यांची स्थानिक पार्टी, प्रभावी संघटन, योग्य उमेदवारांची निवड, नागरी सुविधा व जनतेच्या प्रश्नावर आक्रमकता ही इस्लाम पार्टीच्या विजयाची उजवी बाजू ठरली. 

आणखी वाचा 

Malegaon Election Results 2026: मालेगाव महानगरपालिका निवडणूक 2026 : प्रभाग 1 ते 21 मध्ये 'असा' रंगला सामना, विजयी उमेदवारांची यादी पाहा इथे...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार

व्हिडीओ

Tipu Sultan Controversy : टीपू सुलतानवरुन वक्तव्य, सपकाळ वादात, फडणवीस आक्रमक
Mulund Metro Accident : मुलुंडमध्ये LBS रोडवर वडाळा-कासारवडवलीच्या मेट्रोच्या बांधकामाचा स्लॅब कोसळला
Ganesh Naik Vs Eknath Shinde : एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक पुन्हा वाद उफाळला
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
Sanjay Raut : म्हात्रोळीतील जमीन गुजराती उद्योगपतीच्या घशात घालण्यासाठी राहुल नार्वेकर गेले होते; संजय राऊतांचा आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Munde : देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
देवाभाऊ म्हणजे कामधेनू, त्यांना आमच्या मनातील इच्छा माहीत; धनुभाऊंच्या वक्तव्यानंतर फडणवीसांनी डोक्यात टपली मारली
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
तेलंगणात स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतपत्रिकेवर मतदानात काँग्रेसची त्सुनामी; भाजप, बीआरएस अन् एमआयएला धोबीपछाड, राहुल गांधी म्हणाले..
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
वरिष्ठ पदांवर असलेल्यांनी रिटायर होताच 20 वर्ष पुस्तक लिहिण्याचा नाद अजिबात करायचा नाही! सरकार नवा आदेश जारी करणार?
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
मुंबईकरांचा जीव इतका स्वस्त झालाय का? ‘सो कॉल्ड Infra Man’ फडणवीस निर्माणाधीन बांधकाम कोसळल्याची जबाबदारी घेतील का? काँग्रेस नेत्यांचा हल्लाबोल; आदित्य ठाकरेंचाही सडकून प्रहार
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Video: 'विधानसभा अध्यक्षासोबत ही हाणामारी कोठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी पळ काढला, तुम्ही सांगताय की मी सांगू?' संजय राऊतांचा व्हिडिओ बाॅम्ब टाकत सवाल!
Mumbai Accident Metro Slab Collapased: मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळला, पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची अगतिक नजर, मदतीसाठी धडपड
India Vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
भारत आणि पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामन्यात पावसाने खेळ केल्यास राखीव दिवस आहे का? वर्ल्डकपचा नियम काय सांगतो??
Vaishnavi Hagavne Case: वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात मोठी अपडेट, सहा आरोपींवर आरोप निश्चित, खटल्याची सुनावणी कधी सुरु होणार?
Embed widget