Malegaon Election Result 2026 : मालेगाव महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या (Malegaon Election Result 2026) निकालांनी शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे. भाजपासाठी (BJP) ही निवडणूक मोठा धक्का ठरली असून, मालेगाव महापालिकेवर भाजपाचा सपाटून पराभव झाला आहे. दुसरीकडे, मालेगाव सेक्युलर फ्रंटमधील ‘इस्लाम’ पार्टीने (Islam Party) 35 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
Malegaon Election Result 2026 : पूर्व भागात इस्लाम पार्टीचा झंझावात
मालेगाव महापालिका निवडणुकीतील पूर्व भागात ‘इस्लाम’ पार्टीने जोरदार मुसंडी मारत 35 जागा जिंकल्या, तर समाजवादी पार्टीने 6 जागांवर विजय मिळवला आहे. या निकालामुळे इस्लाम पार्टी आणि समाजवादी पार्टी यांच्या आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले असून, महापालिकेत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, इस्लाम पार्टीची एक जागा बिनविरोध झाली होती, हेही लक्षवेधी ठरले आहे.
Malegaon Election Result 2026 : पश्चिम भागात शिवसेनेचा करिष्मा कायम
शहराच्या पश्चिम भागात शिवसेना (शिंदे गट) ने 18 जागा जिंकत आपला करिष्मा कायम ठेवला आहे. शिवसेना शिंदे गटाने या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावत सत्ता स्थापनेत महत्त्वाचा घटक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Malegaon Election Result 2026 : महापौरपदावर ‘इस्लाम’ पार्टीची मोहोर?
माजी आमदार आसिफ शेख यांनी प्रथमच महापालिका निवडणूक लढवणाऱ्या इस्लाम पार्टीला यशाच्या शिखरावर नेले आहे. समाजवादी पार्टी आणि शिवसेना (शिंदे गट) यांचा पाठिंबा मिळाल्यास मालेगावचा महापौर इस्लाम पार्टीचाच होणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
Malegaon Election Result 2026 : पक्षनिहाय निकाल (एकूण 84 जागा)
इस्लाम पार्टी – 35
समाजवादी पार्टी – 6
शिवसेना (शिंदे गट) – 18
एमआयएम – 20
काँग्रेस – 3
भाजप – 2
शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), वंचित आघाडी, आप, बसपा या पक्षांना एकही जागा जिंकता आलेली नाही.
Malegaon Election Result 2026: भाजपाची दाणादाण, अंतर्गत गटबाजी भोवली
या निवडणुकीत भाजप पूर्णपणे तोंडघशी पडली आहे. मंत्री दादा भुसे यांनी महायुतीचा धर्म पाळत युतीसाठी हात पुढे केला होता, मात्र भाजपमधील अंतर्गत गटबाजी आणि काही नव्या चेहऱ्यांनी युती न करण्याचा घेतलेला टोकाचा निर्णय भाजपला महागात पडला, असे स्पष्ट झाले आहे. भाजपने या निवडणुकीत 20 उमेदवार उभे केले होते, मात्र त्यातील 18 उमेदवारांचा दारुण पराभव झाला, तर केवळ 2 उमेदवार विजयी होऊ शकले.
Malegaon Election Result 2026 : दिग्गजांचा पराभव, काहींचा विजय
या निवडणुकीत भाजपचे अनेक दिग्गज पराभूत झाले.
महापालिकेतील माजी गटनेते सुनील गायकवाड – पराभूत
भाजपचे महानगर प्रमुख देवा पाटील – पराभूत
तर, इस्लाम पार्टीच्या माजी महापौर ताहेरा शेख – विजयी
शिवसेना (शिंदे गट) चे माजी उपमहापौर नीलेश आहेर, नरेंद्र सोनवणे – विजयी
एमआयएमचे माजी महापौर अब्दुल मलिक – पराभूत
काँग्रेसचे महानगर प्रमुख एजाज बेग – विजयी
Malegaon Election Result 2026: मालेगावच्या राजकारणात नवा अध्याय
या निकालांनी मालेगावच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला असून, इस्लाम पार्टीचा उदय आणि भाजपाचा पराभव हा राज्याच्या राजकारणातही चर्चेचा विषय ठरणार आहे. आता सर्वांचे लक्ष महापौर कोणाचा होणार आणि सत्ता स्थापन कशी होणार, याकडे सर्वांचे लागले आहे.
आणखी वाचा
