पुणे: राज्यातील विधानसभेच्या 288 मतदारसंघातील निकाल काल (शनिवारी) जाहीर झाले. राज्यभरात पुन्हा एकदा महायुतीने बाजी मारल्याचं चित्र दिसून आलं आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणावर जागा मिळवण्यात महायुतीला यश आलं आहे. पुणे शहरातील (Pune Assembly Elections 2024) विधानसभेच्या आठपैकी सात जागांवर महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. शहरातील (Pune Assembly Elections 2024) सर्व महत्त्वाचे मतदारसंघ पुन्हा एकद भाजपने जिंकले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला. वडगाव शेरीची जागा जिंकत महाविकास आघाडीनं आपलं अस्तित्व टिकवलं. मात्र, जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली आहे. तर कल्याणीनगर अपघात प्रकरणी चर्चेत आलेले राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. (Pune Assembly Elections 2024)

भाजपने कोथरूड (Kothrud), पर्वती (Parvati), शिवाजीनगर (Shivajinagar), पुणे कॅन्टोन्मेंट, खडकवासला, आणि कसबा पेठ या जागा लढवल्या आणि या सहा जागांवर विजय मिळवला. त्यात कोथरूडमधून चंद्रकांत पाटील मोठ्या मताधिक्यांने सलग दुसर्‍यांदा विक्रमी मतांनी विजयी झाले आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांचा तब्बल 1 लाख 11 हजार 545 इतक्या मतांनी पराभव केला. तर हडपसर मतदारसमघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार चेतन तुपे विजयी झाले आहेत.

पुण्यात महायुतीचे (Mahayuti) 7 उमेदवार विजयी तर आघाडीला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. पुणेकरांची पसंती महायुतीला असल्याचं चित्र यावरून दिसून येत आहे, भाजपचे 6 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) पक्षाकडून एक उमेदवार विजयी झाला आहे. (Pune Assembly Elections 2024)

विधानसभा निहाय निकाल

महायुती (Mahayuti)

कोथरूड

विजयी उमेदवार: चंद्रकांत पाटीलमतं: 1,59,234

पराभूत उमेदवार: चंद्रकांत मोकाटेमतं:47,193

मताधिक्य: 1,12,041

शिवाजीनगर

विजयी उमेदवार: सिद्धार्थ शिरोळेमतं: 84,695

पराभूत उमेदवार: दत्तात्रय बहिरटमतं: 47,993

मताधिक्य: 36,702

पर्वती

विजयी उमेदवार: माधुरी मिसाळमतं: 1,18,193

पराभूत उमेदवार: अश्विनी कदममतं: 63,533

मताधिक्य: 54,660

खडकवासला

विजयी उमेदवार: भीमराव तापकीरमतं: 1,63,131

पराभूत उमेदवार: सचिन दोडकेमतं: 1,10,809

मताधिक्य: 52,322

हडपसर

विजयी उमेदवार: चेतन तुपेमतं: 1,34,810

पराभूत उमेदवार: प्रशांत जगतापमतं: 1,27,688

मताधिक्य: 7,122

पुणे कँटोन्मेंट

विजयी उमेदवार: सुनील कांबळेमतं: 76,032

पराभूत उमेदवार: 65,712

मताधिक्य: 10,320

कसबा

विजयी उमेदवार: हेमंत रासनेमतं: 90,046

पराभूत उमेदवार: रवींद्र धंगेकर मतं: 70,623

मताधिक्य: 19,423

महा विकास आघाडी (Mahavikas Aghadi)

वडगाव शेरी

विजयी उमेदवार: बापूसाहेब पठारेमतं: 1,33,689

पराभूत उमेदवार: सुनील टिंगरेमतं: 1,28,979

मताधिक्य: 4710