Devendra Fadnavis Oath Taking Ceremony : गेल्या काही दिवसांत राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आता सत्तास्थापनेसाठी लगबग चालू आहे. आज म्हणजेच 5 डिसेंबर 2024 रोजी नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी जय्यत तयारी चालू आहे. आझाद मैदानात कोणताही अनुचूत प्रकार घडू नये तसेच शपथविधी समारंभाला लोकांची होणारी गर्दी लक्षात घेते येथे जवळपास 1500 पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 3 वाजता हा शपथविधी सोहळा होणार आहे.