नवी दिल्ली : राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीबाबत (Maharashtra ZP Election) मोठी अपडेट समोर आली आहे. जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि पंचायत समितीच्या निवडणुका (Panchayat Samiti Elections 2026) घेण्यासाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्या, असा अर्ज राज्य निवडणूक आयोगाकडून (Election Commission) सर्वोच्च न्यायालयाकडे (Supreme Court) करण्यात आला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाला 31 जानेवारी 2026 पर्यंत वेळ दिली होती. 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांमध्ये 50 टक्क्यांमध्ये आरक्षण आहे.
तर इतर 20 जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडली गेली असल्यामुळे त्याविषयी काय निर्णय होणार, यावर प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान यावर आज (12 जानेवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होईल. या सुनावणीत महाराष्ट्राच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची दिशा ठरणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या अर्जावर सर्वोच्च न्यायालय आज काय निर्णय देतं, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Zilla Parishad and Panchayat Samiti Elections 2026)
आणखी वाचा