Zilla Parishad Election : 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण, दिग्गजांचं भविष्य मतपेटीत बंद, 9 तारखेला मतमोजणी
Zilla Parishad Election 2026 : राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान पार पडली. जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी मतदान झाले.

Zilla Parishad Election 2026 : राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची मतदान प्रक्रिया आज पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Death News) यांच्या निधनामुळे राज्यात जाहीर करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या दुखवट्याच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांच्या तारखेमध्ये (Zilla Parishad Election Date ) बदल करण्यात आला होता. त्यानुसार 5 फेब्रुवार रोजी होणारे मतदान आज 7 फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर मतमोजणीची तारीखही बदलून 9 फेब्रुवारी करण्यात आलंय. दरम्यान, आज काही अपवाद वगळता सर्व ठिकाणी शांततेच मतदान प्रक्रिया पार पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. काही ठिठाणी अल्प तर काही ठिकाणी मतदारांनी मतदानासाठी चांगला प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं.
Zilla Parishad Election 2026 : राज्यभरात जिल्हा परिषद, पंचायत समितीचा धुरळा, पंचायत समित्यांवर राज्य कुणाचं?
दरम्यान, राज्यभरातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज (7 फेब्रुवारी) मतदान पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या 731 आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी मतदान होत आहे. निवडणुकीच्या रिंगणात एकूण 7 हजार 438 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. जिल्हा परिषदेच्या जागांसाठी 2 हजार 624 तर पंचायत समितीसाठी 4 हजार 814 उमेदवार मैदानात उतरले आहेत. या सगळ्यांचं भवितव्य आज मतपेटीत कैद होणार आहे. आज सकाळी साडेसात ते संध्याकाळी साडेपाच दरम्यान ही मतदान प्रक्रिया पार पडेल. निवडणूक आयोगाकडून आणि जिल्हा प्रशासनाकडून या मतदान प्रक्रियेची तयारी सध्या सुरु आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर संबंधित 12 जिल्ह्यांमधील शाळा, महाविद्यालये आणि सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानानंतर 9 फेब्रुवारीला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे पुकारण्यात आलेल्या दुखवट्यामुळे या निवडणुका 5 फेब्रुवारीऐवजी 7 फेब्रुवारीला घेण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतलाय. त्या अनुषंगाने आज मतदानाची रणधुमाळी होणार आहे.
Parbhani Zilla Parishad Elections: 433 उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार
गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेली परभणी जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून आज मतदान होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५४ गटांसह पंचायत समितीच्या १०८ गणांसाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. परभणी जिल्ह्यात एकूण १ हजार २७८ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यासाठी प्रशासन सज्ज झालं आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांतील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून आज मतदान केंद्र अधिकाऱ्यांना ईव्हीएम मशीन, मतदार याद्या आणि इतर साहित्याचं वाटप करण्यात आलं. हे साहित्य घेऊन मतदान अधिकारी केंद्राकडे रवाना झाले असून, ५४ गटांसाठी २४७ तर १०८ गणांसाठी ४३३ उमेदवारांचं भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादित असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली होती. त्यानुसार या सर्व ठिकाणी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाल्यानंतर मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्या अनुषंगाने आज मतदानाची रणधुमाळी होणार आहे.
Baramati ZP Election: काटेवाडी जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर पवार कुटुंबीय मतदान करणार
काटेवाडीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केंद्रावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार, विजया पवार, नीता पवार, आशा पवार यांचे मतदान होणार आहे. याशिवाय याच मतदान केंद्रावर श्रीनिवास पवार, शर्मिला पवार युगेंद्र पवार हे देखील मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
हे देखील वाचा




















