Madha Assembly Constituency Result 2024 : माढा विधानसभा (Madha Vidhansabha) मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. या मतदारसंघात कोण बाजी मारणार याची सर्वत्र चर्चा सुरु होती. दरम्यान, सुरुवातीचे काही कल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) हे आघाडीवर आहेत. तर अपक्ष उमेदवार रणजित शिंदे ( Ranjit Shinde) हे पिछाडीवर आहेत. 18 व्या फेरीअखेर अभिजीत पाटील हे 13615 मतांनी आघाडीवर आहेत. 


माढा तालुक्यातून अभिजीत पाटील यांना आघाडी 


माढा तालुक्यातील लढत ही अत्यंत अटीतटीची मानली जात होती. कारण माढ्यात तिंगरी लढत होती. यामध्ये माढ्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे निवडणूक लढवत होते. तर त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे अभिजीत पाटील तर महायुतीकडून अजित पवार गटाच्या मिनल साठे निव़डणूक लढवत होत्या. सध्या आलेल्या कलानुसार अभिजीत पाटील हे 13615 मतांनी आघाडीवर आहेत. दरम्यान, माढा विधानसभा मतदारसंघात माढा तालुक्यातील 18 गावे, पंढरपूर तालुक्यातील 42 तर माळशिरस तालुक्यातील 14 गावे आहेत. यामधील माढा तालुक्यातील 78 गावांची मतमोडणी पूर्णपणे पार पडली आहे.   


दरम्यान, अभिजीत पाटील यांच्यासाठी शरद पवार यांच्यासह दिग्गज नेत्यांनी सभा घेतल्या होत्या. त्याचा मोठा फायदा अभिजीत पाटील यांना झाल्याचे दिसत आहे. दुसरीकडे आमदार बबनदादा शिंदे यांनी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंत केले होते. त्यानंतर विधानसबेच्या निवडणुकीत पुत्र रणजित शिंदे यांना अपक्ष निव़डणुकीत उभे केले होते. त्यामुळं अजित पवार यांनी काँग्रेसच्या मिनल साठे यांनी तिकीट दिले होते.  


महत्वाच्या बातम्या:


Solapur Assembly Election : सोलापुरात 65.41 टक्के मतदान, वाढीव मतदानाचा कौल कुणाला; जिल्ह्यात कोणाला किती जागा?