Omraje Nimbalkar : आम्ही  पैशाचे लालची असतो तर 50 कोटी घेऊन तेव्हाच तिकडे  गेलो असतो. सत्तेवर आणि 50 खोक्यांवर लाथ मारुन आम्ही उद्धव ठाकरेंबरोबर इमानदारीने उभे आहोत, असा टोला खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांना लगावला. आता परंडा विधानसभा मतदारसंघात (Paranda Vidhansabha Election)  पैशांची ढगफुटी होणार आहे. मात्र लोक मशालीला मतदान करतील असंही ओमराजे म्हणाले. 


परांडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार रणजित पाटील यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थितीत होते. आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छोटेखानी सभा पार पडली. यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीचे उमेदवार तानाजी सावंत यांच्यावर जोरदार टीका केली. आम्ही  पैशाचे लालची असतो तर 50 कोटी घेऊन तवाच तिकडे पालथ झाले असतो असे ओममराजे म्हणाले. सत्तेवर आणि 50 खोक्यांवर लाथ मारून आम्ही उद्धव ठाकरेंबरोबर इमानदारीने उभे आहोत, असा टोला ओमराजे निंबाळकर यांनी तानाजी सावंत यांना लगावला.


मागच्या वेळी अतिवृष्टी होती, आता पैशांची ढगफुटी 


कोण काय करते ते जनतेला सगळं दिसतं असेही ओमराजे निंबाळकर म्हणाले. आम्हाला कोणाच्या सर्टीफिकेटची गरज नसल्याचे ओमराजे म्हणाले. जाबाबदारी तुमच्यावर मोठी आहे. मागच्या वेळी अतिवृष्टी होती, आता पैशांची ढगफुटी होणार आहे असं ओमराजे म्हणाले. आपलं चिन्ह आता मशाल आहे, त्यामुळं मशालीच्या चिन्हासमोरील बटन दाबून रणजित पाटील यांना विजयी करा असं आवाहन यावेळी ओमराजे निंबाळकर यांनी केलं आहे.  


परांडा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार


परांडा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. या मतदारसंघात आघाडीत बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून दिवंगत माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून माजी आमदार राहुल मोटे मैदानात उतरले आहे. तर महायुतीकडून विद्यमान आमदार आणि मंत्री तानाजी सावंत निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं या मतदारसंघात चुरशीची तिरंगी लढत होम्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज उमेदवारी अर् भरण्याचा शेवटचा दिलस होती. आता अर्ज काढण्याची अंतिम तारीख ही 4 नोव्हेंबर आहे. तर 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


मंत्री तानाजी सावंतांच्या मतदारसंघातच ठाकरेंच्या पठ्ठ्याला सर्वाधिक लीड, वाचा किती?; आमदारकीला मोठा संघर्ष