Washim Maharashtra Assembly Election : वाशिम  (Washim) जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार भावना गवळी (Bhavna Gawli) यांच्या विरोधात भाजप नेते अनंतराव देशमुख (Anantrao Deshmukh) यांनी बंडखोरी केली आहे. भावना गवळी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं वाशिम विधानसभा मतदारसंघात शिवसेने शिंदे गटाचे इच्छुक उमेदवार संजय आधारवाडे (Sanjay Aadharwade) यांनी भाजपच्या उमेदवारच्या विरोधात बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप विरोधात बंडखोरीबाबत तशी चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सोबत केल्याचा दावा देखील संजय आधारवाडे यांनी केला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सगळं  काही ठिक नसल्याची चर्चा सुरु आहे. आहे का? असा सवाल उपस्थित होतोय.


वाशिम मतदारसंघात भाजप विरूद्ध शिवसेना ठाकरे गटात चुरशीचा सामना 


वाशीम विधानसभा मतदारसंघात यावेळेस भाजप विरूद्ध शिवसेना ठाकरे गटात चुरशीचा सामना होत आहे. भाजपने भाकरी फिरवत चार वेळा आमदार राहिलेल्या लखन मलिक यांची उमेदवारी दिली नाही. त्यांच्याऐवजी श्याम खोडे यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला आहे. त्यामुळे या जागेवर वरिष्ठांचे लक्ष राहणार आहे. पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी कार्यकारिणीत देखील बदल केला. त्याचा परिणाम जातीय समीकरणासह निवडणुकीवर देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे गेल्या निवडणुकीत वंचित आघाडीच्या तिकीटावर दुसऱ्या क्रमांकाची 52 हजार 464 मते घेणारे डॉ. सिद्धार्थ देवळे यांनी हातात मशाल घेतली. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून ते रिंगणात आहेत. गेल्या वेळेस अपक्ष लढून 45 हजार 407 मते घेणारे शशिकांत पेंढारकर पुन्हा एकदा अपक्षच निवडणूक रिंगणात आहेत. वाशीममध्ये मविआ व महायुतीमध्ये बंडखोरी झाली आहे. त्यामुळे मतविभाजन होईल. 


2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत काय झालं? 


लखन सहदेव मलिक, भाजप - 66,159 (13,695 मतांनी विजय) 
सिद्धार्थी आकाराम देवळे, वंचित बहुजन  आघाडी - 52 564 


इच्छुकांना तिकीट न मिळाल्यामुळं बंडखोरी


विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम चांगलाच पेटल्यांच चित्र पाहायला मिळत आहे. ही निवडणूक लढण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षातील इच्छुकांना तिकीट न मिळाल्यामुळं अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली आहे. यामध्ये अनेकांनी बंडखोरी करण्याचा निर्णय देखील जाहीर केला आहे. ही बंडखोरी महाविकास आघाडीसह महायुतीत देखील आहे. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच असा निर्णय अनेक नेत्यांनी घेतला आहे. त्यामुळं नेत्यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. दरम्यान, येत्या 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 23 तारखेला विधानसभेचा निकाल लागणार आहे.