Raj Thackeray : अमित ठाकरेला  (Amit Thackeray) उभे करणे हे माझं लॉजिक नव्हते. पक्षाच्या सर्व नेत्यांनी ते ठरवल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले. बाकीच्या उमेदवारांसारखेच अमित ठाकरे देखील एक उमेदवार आहेत. बाकीच्यांसाठी जेवढा प्रयत्न करेन तेवढाच अमित ठाकरेसाठी देखील करेल असे राज ठाकरे म्हणाले. अविनाश जाधव , संदीप वगैरे असो की अमित सगळ्यांसाठी मी तेवढेच प्रयत्न करेन असे राज ठाकरे म्हणाले. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझा व्हिजन या कार्यक्रमात बोलत होते. 


आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार न देणं हा माझा निर्णय होता असेही राज ठाकरे म्हणाले. प्रत्येकजण आपापल्या स्वभावाप्रमाणे वागत असतो असे राज ठाकरे म्हणाले. माझ्यासारखा विचार इतरांनी करावा असं बंधन नाही. आदित्यविरोधात उमेदवार देऊ नये असं सांगणारा फोन मला कोणीही केला नव्हता असेही राज ठाकरे म्हणाले. आदित्यसंदर्भात घेतलेल्या निर्णयाचे मला अजिबात शल्य नसल्याचे राज ठाकरे म्हणाले. 


कोणत्याही पक्षाच्या बाबतीत अशा गोष्टी होता कामा नये


पक्ष फोडाफोडीवर घटनेवरही राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. कोणत्याही पक्षाच्या बाबतीत अशा गोष्टी होता कामा नये, असे राज ठाकरे म्हणाले. मी  शिवसेनेतून बाहेर पडलो, त्यावेळी मी पक्ष फोडला नाही. मला पक्षातूल इतर नेते फोडून पक्ष निर्माण करायचा नव्हता असे राज ठाकरे म्हणाले. मला वेळ लागला तरी चालेल असे राज ठाकरे म्हणाले. मी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा शक्य असूनही आमदार फोडले नाहीत. मग मला सत्तेत येण्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल. मला अशाप्रकारे फोडाफोडी करुन कधीही सत्ता नको, असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. पण महाराष्ट्रावर आताच्या परिस्थितीतून बाहेर येईल. महाराष्ट्रावर खोलवर संस्कार झाले आहेत. यातून महाराष्ट्र बाहेर येईल. महाराष्ट्र खूप मोठा आहे. असे राज ठाकरे म्हणाले. 


आपण कोणाला कुठे आणि किती सांगायला जाणार,


अमित विरोधात माहीममध्ये उमेदवार देणे हा, हा प्रत्येकाचा स्वभावाचा भाग झाला आहे. प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार वागत असतो. भाजपसारख्या मॅच्युअर्ड पक्षांना ही गोष्ट कळू शकते, सगळ्यांनाच हे कळेल असं नाही. बाकी प्रत्येकाचे मिळेल ते ओरबाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आपण कोणाला कुठे आणि किती सांगायला जाणार, असे राज ठाकरे यांनी म्हटले.


महत्वाच्या बातम्या:


Raj Thackeray: अहो, माझ्या पक्षाची निशाणी कमावलेली, ढापलेली नव्हे; राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला