Shivaji Park Maidan Shivsena MNS : विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. 20 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. त्याआधी दोन दिवस म्हणजेच 18 नोव्हेंबरला दुपारी प्रचार बंद होणार आहे. त्यामुळं 17 नोव्हेंबरला सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी मनसे (MNS) आणि शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena Thakge group) दोघेही आग्रही आहेत.   


सभेसाठी शिवाजी पार्क मिळवण्यासाठी दोन्ही ठाकरेंचा प्रयत्न 


17 नोव्हेंबरची रात्रीची शेवटची सभा शिवाजी पार्क मैदानावर व्हावी, असा दोन्हीही ठाकरेंचा आग्रह आहे.  17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी  इतर राजकीय पक्षास सहभाग घेण्यास परवानगी दिल्यास संघर्ष उद्भवू शकतो. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळावी यासाठी  महापालिका निवडणूक आयोगाकडे ठाकरे यांच्या शिवसेनेनं पत्र दिलं आहे. 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन असल्याने हजारो शिवसैनिक स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्यामुळं मनसेला  परवानगी मिळाल्यास कुठलीही संघर्षाची ठिणगी पडू नये, यासाठी  शिवाजी पार्कवर सभा  घेण्याची परवानगी मिळावी, अशी उद्धव ठाकरे यांची  मागणी आहे.


राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्या प्रचारार्थ शिवाजी पार्क मैदानावर सभा घेणार?


तर माहीम विधानसभा मतदारसंघात  राज ठाकरेंचे  सुपुत्र अमित ठाकरे हे उमेदवार असल्याने 17 नोव्हेंबरला स्वतः राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्या प्रचारार्थ शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्याचं  त्यांनी ठरवलं आहे . शिवाजी पार्क मैदान सभेसाठी मिळावे यासाठी दोन्ही पक्षाकडून मुंबई महापालिका प्रशासनाला विनंती करण्यात आली आहे. प्रशासनाच्या नियमानुसार परवानगीसाठी ज्यांचं पत्र पहिले महापालिकेला दिले जाते, त्यांना परवानगी मिळते. त्यामुळं मनसेने परवानगी पत्र आधी दिला असल्याचा दावा मनसे पक्षाकडून  करण्यात आला आहे. 


अद्याप कोणालाही परवानगी दिली नाही


प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून शिवाजी पार्क मैदानावर एक तरी सभा घेतली जाते. त्यामुळं शेवटची सभा शिवाजी पार्क मैदानावर घेण्यावर ठाकरेंची शिवसेना प्रयत्नशील आहे. त्यामुळं  प्रचार सभेसाठी शिवाजी पार्क मैदान राज ठाकरेंना मिळतं ते उद्धव ठाकरेंना हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. महापालिकेकडून 10 12 आणि 14 या तीन  दिवसासाठी मुंबई महापालिकेने इतर राजकीय पक्षांसाठी  सभा घेण्याची परवानगी दिल्याची माहिती आहे. मात्र, 17 तारखेला अद्याप कोणालाही परवानगी मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेली नाही, नगर विकास विभागाकडून हे परवानगी चे पत्र  दिला जाऊ शकते. 


महत्वाच्या बातम्या:


राज ठाकरे काय बोलतील ते सांगता येत नाही, त्याकडं तुम्ही लक्ष देऊं नका, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सल्ला