नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) चा रणसंग्राम गेल्या महिन्याभरापासून सुरु आहे. 20 नोव्हेंबरला राज्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली. आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. नाशिकमधील 15 विधानसभा मतदारसंघात एकूण 196 उमेदवार रिंगणात आहेत. छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal), दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यासह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नाशिकमधून (Nashik District Vidhan Sabha Election 2024) मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिकमधील 15 मतदारसंघात मतदारांनी कुणाला कौल दिला? याबाबत जाणून घेऊयात...

नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ : ॲड. राहुल ढिकले विजयी

ॲड. राहुल ढिकले - भाजप गणेश गीते - राष्ट्रवादी शरद पवार गटप्रसाद सानप - मनसे

नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ : देवयानी फरांदे विजयी

देवयानी फरांदे - भाजपवसंत गीते - शिवसेना ठाकरे गट मुशिर सय्यद - वंचित 

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ : सीमा हिरे विजयी

सीमा हिरे- भाजपसुधाकर बडगुजर- शिवसेना ठाकरे गटदिनकर पाटील - मनसे दशरथ पाटील- स्वराज्य पक्ष

देवळाली विधानसभा मतदारसंघ : सरोज अहिरे विजयी

सरोज आहेर - अजित पवार गटयोगेश घोलप - ठाकरे गटडॉ. राज्यश्री अहिरराव -  शिंदे गट अविनाश शिंदे - वंचित 

इगतपुरी विधानसभा मतदारसंघ : हिरामण खोसकर विजयी  

हिरामण खोसकर - अजित पवार गट लकी जाधव - काँग्रेसकाशिनाथ मेंघाळ - मनसेनिर्मला गावित-  ठाकरे गट बंडखोर, अपक्ष 

दिंडोरी विधानसभा मतदारसंघ नरहरी झिरवाळ विजयी

नरहरी झिरवाळ- अजित पवार गट सुनिता चारोस्कर- राष्ट्रवादी शरद पवार गट

कळवण - सुरगाणा विधानसभा मतदारसंघ 

नितीन पवार - अजित पवार गट जीवा पांडू गावित माकप 

नितीन पवार आघाडीवर 

निफाड विधानसभा मतदारसंघ : दिलीप बनकर विजयी

दिलीप बनकर अजित पवार गटअनिल कदम - ठाकरे गट गुरुदेव कांदे - प्रहार

सिन्नर विधानसभा मतदारसंघ : माणिकराव कोकाटे विजयी

माणिकराव कोकाटे-  अजित पवार गट,महायुती उदय सांगळे - शरद पवार गट,महाविकास आघाडी 

नांदगाव विधानसभा मतदारसंघ : सुहास कांदे विजयी

सुहास कांदे - शिंदे गट,महायुती गणेश धात्रक - ठाकरे गट, महाविकास आघाडी.समीर भुजबळ - अपक्ष ( बंडखोर)

येवला विधानसभा मतदारसंघ : छगन भुजबळ विजयी

छगन भुजबळ - महायुती- अजित पवार गट माणिकराव शिंदे - महाविकास आघाडी, शरद पवार गट 

चांदवड विधानसभा मतदारसंघ राहुल आहेर विजयी

राहुल आहेर - भाजप, महायुती शिरीष कोतवाल - काँग्रेस, महाविकास आघाडी केदा आहेर - अपक्ष 

बागलाण विधानसभा मतदारसंघ दिलीप बोरसे विजयी

दिलीप बोरसे- भाजप, महायुती.दीपिका चव्हाण- शरद पवार गट, महाविकास आघाडी.

मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघ : दादा भुसे विजयी

दादा भुसे - शिंदे गट, महायुती अद्वय हिरे - ठाकरे गट, महाविकास आघाडी. 

मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघ : 

मुक्ती मोहम्मद इस्माईल - एम आय एमएजाज बेग - काँग्रेस शान ए हिंद - समाजवादी पार्टी आसिफ शेख - अपक्ष

मुक्ती मोहम्मद इस्माईल - एम आय एम आघाडीवर

Disclaimer: निवडणुकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. विजयी उमेदवारांची यादी अपडेट होत आहे. त्यानुसार बातमी रिफ्रेश करा.