Kolhapur District Assembly Constituency : ज्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी दमदार कामगिरी करेल, अशी चर्चा रंगली होती त्याच कोल्हापूर जिल्ह्यातून महाविकास आघाडी अक्षरशः हद्दपार झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दहाच्या दहा जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. चंदगडमध्ये सुद्धा अपक्ष उमेदवार विजय निवडून आला तो सुद्धा भाजप बंडखोर आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीची सरशी झाली आहे. जो संदेश कोल्हापुरातून दिला जातो तोच राज्यभर पसरतो असं नेहमीच म्हटले जाते आणि ज्या पद्धतीने महायुतीला राज्यात यश मिळालं आहे त्यावरून स्पष्ट झालं आहे. महायुतीच्या यशात कोल्हापूरचा 100 टक्के वाटा राहिला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला मोठा दणका बसला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजपने दोन जागांवर विजय मिळवला आहे. कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक विजयी झाले आहेत.  इचलकरंजीमधून राहुल आवाडे जिंकले आहेत. शिवसेना शिंदे गटाने सुद्धा जिल्ह्यातील तिन्ही जागा पटकावल्या आहेत. राधानगरीमधून प्रकाश आबिटकर, करवीरमधून चंद्रदीप नरके आणि कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला कागलची जागा राखण्यामध्ये यश मिळालं आहे. या ठिकाणी हसन मुश्रीफ यांनी सलग सहाव्यांदा विजय मिळवला आहे. दरम्यान जनसुराज शक्ती पक्षानेही दमदार कामगिरी करताना दोन जागा पटकावल्या आहेत. शाहूवाडीमधून विनय कोरे यांनी विजय मिळवला असून हातकणंगले मतदारसंघातून अशोकराव माने विजयी झाले आहेत.  शिरोळमध्ये सुद्धा शिवसेना पुरस्कृत शाहू आघाडीचे राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा विजय झाला आहे. त्यामुळे महायुतीच्या वाट्याला जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा गेल्या आहेत.

ज्या काँग्रेसने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण, करवीर आणि हातकलंगले या चार जागा जिंकल्या होता. या चारही जागांवर दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. त्यामुळे एक प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार झाली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटाची सुद्धा तीच अवस्था झाली आहे. 

क्रमांक विधानसभा मतदारसंघ महायुती उमदेवार महाविकास आघाडी वंचित/अपक्ष/इतर विजयी उमेदवार
1 कोल्हापूर दक्षिण  अमल महाडिक  ऋतुराज पाटील  अरुण सोनवणे अमल महाडिक 
2 कोल्हापूर उत्तर  राजेश क्षीरसागर  राजेश पाटील (पुरस्कृत)   राजेश क्षीरसागर 
3 करवीर चंद्रदीप नरके राहुल पाटील  संताजी घोरपडे चंद्रदीप नरके
4 हातकणंगले  अशोकराव माने राजू बाबा आवळे सुजित मिणचेकर  अशोकराव माने
5 इचलकरंजी राहुल आवाडे  मदन कारंडे    राहुल आवाडे 
6 शिरोळ राजेंद्र पाटील यड्रावकर  गणपतराव पाटील उल्हास पाटील  राजेंद्र पाटील यड्रावकर 
7 शाहूवाडी-पन्हाळा विनय कोरे  सत्यजित पाटील    विनय कोरे 
8 कागल-गडहिंग्लज हसन मुश्रीफ समरजितसिंह घाटगे   हसन मुश्रीफ
9 चंदगड  राजेश पाटील  नंदाताई बाभुळकर  शिवाजी पाटील शिवाजी पाटील
10 राधानगरी भुदरगड प्रकाश आबिटकर के. पी. पाटील ए. वाय. पाटील

 

प्रकाश आबिटकर

2019 मध्ये काय घडलं?

2019 च्या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर उत्तर, करवीर, दक्षिण आणि हातकणंगलेमध्ये काँग्रेसने विजय मिळवला होता. इचलकरंजीमध्ये अपक्ष प्रकाश आवाडे यांनी विजय मिळवला होता. शिरोळमध्येही अपक्ष राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विजय मिळवला होता. कागलमध्ये अजित पवार गटात असलेल्या हसन मुश्रीफ आणि चंदगडमध्ये राजेश पाटील यांनी विजय मिळवला होता. राधानगरीमधून शिवसेनेचे प्रकाश आबिटकर विजयी झाले होते. शाहुवाडीतून विनय कोरे विजयी झाले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या