अकोला: विधानसभा निवडणुकांचा निकाल काल (शनिवारी) समोर आला आहे. राज्यात महायुती सरकारने मोठ्या प्रमाणावर विजय मिळवला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये एकूण 5 विधानसभा मतदारसंघ आहेत. दरम्यान अकोला जिल्ह्यामध्ये 5 पैकी 3 मतदारसंघामध्ये भाजपने विजय मिळवला आहे.(Akola Vidhan Sabha Election 2024) 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या विधानसभेला 4 मतदारसंघ हे भाजपकडे गेले होते. तर एक मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटाकडे होता. आता भाजपचा एक मतदारसंघ काँग्रेसने जिंकला आहे. 


अकोला पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार साजीद खान पठाण यांनी भाजपला धक्का देत निसटता विजय मिळवला. जिह्यातील पाच मतदारसंघांपैकी तीन भाजपच्या कमळाने फुलले आहे, तरी अकोला पश्चिममध्ये काँग्रेसच्या ‘पंजा’ने विजय मिळवला. बाळापूरात नितीन देशमुख यांच्या विजयानंतर मशाल पेटल्याने महाविकास आघाडीला दिलासा मिळाला. भाजपच्या बालेकिल्ल्यात हा निकाल पक्षासाठी धक्कादायक ठरला असून आगामी राजकीय रणनीतीसाठी महत्त्वाचा ठरेल. मात्र एकंदरीत जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व दिसून येत आहे.


अकोला जिल्ह्यात कोणत्या पक्षाला किती जागा?


भाजप - 3
काँग्रेस - 1
शिवसेना ठाकरे गट - 1 


कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा गुलाल
1) अकोट : 


एकूण मतदार : 311972
झालेले एकूण मतदान : 213382
नोटा : 1161
अवैध मते : 121
रद्द केलेली मते : 06


प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते 


उमेदवार                      पक्ष          मिळालेली मते 
प्रकाश भारसाकळे        भाजप        93338
महेश गणगणे              काँग्रेस         74487
दीपक बोडखे               वंचित          34135


भाजपाचे प्रकाश भारसाकळे हे 18851 मतांनी विजयी
 


2) अकोला पुर्व : 


एकूण मतदार : 355797
झालेले एकूण मतदान : 220360
नोटा : 1510
अवैध मते : 81
रद्द केलेली मते : 09


प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते 


उमेदवार                   पक्ष          मिळालेली मते 


रणधीर सावरकर        भाजप          108619
गोपाल दातकर          सेना ठाकरे     58006
ज्ञानेश्वर सुलताने        वंचित            50681


भाजपाचे रणधीर सावरकर 50613 मतांनी विजयी


3) बाळापूर : 


एकूण मतदार : 311167
झालेले एकूण मतदान : 221042
नोटा : 289
अवैध मते : 03
रद्द केलेली मते : 05


प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते 


उमेदवार                   पक्ष          मिळालेली मते


नितीन देशमुख         सेना ठाकरे  82088
नातिकोद्दीन खतीब    वंचित         70349
बळीराम सिरस्कार    सेना शिंदे      61192


ठाकरेंच्या शिवसेनेचे नितीन देशमुख 11739 मतांनी विजयी.


4) मुर्तिजापूर (राखीव - अनुसूचित जाती) : 


एकूण मतदार : 311175
झालेले एकूण मतदान : 207868
नोटा : 886
अवैध मते : 94
रद्द केलेली मते : 00


प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते 


उमेदवार                  पक्ष          मिळालेली मते


हरीश पिंपळे           भाजप       91820
सम्राट डोंगरदिवे       राष्ट्रवादी शरद 55956
डॉ. सुगत वाघमारे    वंचित         49608


भाजपचे हरीश पिंपळे 35864 मतांनी विजयी 


5) अकोला पश्चिम :


एकूण मतदार : 351092
झालेले एकूण मतदान : 204060
नोटा : 1257
अवैध मते : 172
रद्द केलेली मते : 44


प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते 


उमेदवार                  पक्ष          मिळालेली मते


साजिदखान पठाण काँग्रेस       88718
विजय अग्रवाल       भाजप       87435
हरीश आलिमचंदानी अपक्ष        21481
डॉ. अशोक ओळंबे    प्रहार         2127
राजेश मिश्रा              अपक्ष        2653


काँग्रेसचे साजीदखान पठाण 1283 मतांनी विजयी.