Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीत ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येऊ शकतात, तिथं मराठा समाजाचे उमेदवार उभे करायचे आणि ज्या ठिकाणी निवडून येऊ शकत नाही तेथील आपल्या विचारांच्या उमेदवारांकडून स्टॅम्प पेपरवर लिहून त्यांना निवडून आणायचं आहे. ज्यांना उमेदवारी अर्ज भरायचे आहे त्यांनी भरावे, पण 29 ऑक्टोबरला मी सांगितलेल्या ठिकाणी अर्ज कायम ठेवून निवडणुक लढवायची असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज (20 ऑक्टोबर) अंतरवाली सराटीमध्ये सभा घेऊन केली. जरांगे पाटील यांनी उमेदवार देण्याची घोषणा केल्याने त्याचा फटका कोणाला बसणार? याचं उत्तर 23 नोव्हेंबर रोजी मिळणार आहे. 



एससी आणि एसटीच्या जागेवर आपण उमेदवार देणार नाही


मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, जिथं निवडून येतील तिथे उमेदवार उभे करणार आहे. एससी आणि एसटीच्या जागेवर आपण उमेदवार देणार नाही, आपल्या विचारधारेशी असणाऱ्यांना आपण निवडून आणायचं आहे. ज्या ठिकाणी आपण उभा करायचं नाही, तिथे आपण जो 500 रुपयांच्या  बाँडवर लिहून देईल त्याला आपण निवडून आणायचे, बाकीचे सर्व पाडायचे असल्याची घोषणा जरांगे पाटील यांनी केली. ते म्हणाले की, आता आपण सर्व जाती धर्माचे लोक उभे करायचे आहेत. कुठे मराठा, दलित मुस्लिम समीकरण जुळते का? याचाही अंदाज घ्यायचा आहे. एका जातीवर सीट निवडून येऊ शकत नाही. समीकरण जुळून येतोय का बघू, तुम्ही फॉर्म भरा, 29 तारखेला ज्याला फॉर्म काढायचा आहे त्यानं काढायचा. असेही त्यांनी सांगितले. 


2 ते 3 दिवसात मी मतदारसंघाची नाव सांगणार


मनोज जरांगे पुढे म्हणाले की, संमिश्र ताकत ठेवली तर मराठा जिंकू शकतो. त्यामुळे काही निवडून आणू काही पाडू. 36 मतदारसंघ असे आहेत तिथे मराठाच निवडून आणू शकतो. त्यामुळे समीकरण नाही जुळल, तर पुढं जाण्यासाठी पाहून घेऊ. ज्याने मराठ्यान संपवले आहे त्याला संपवायचं आहे. तुम्ही फॉर्म भरून घ्या, त्यात मेरिट ठरवू, 2 ते 3 दिवसात मी मतदारसंघाची नाव सांगणार असल्याची घोषणा त्यांनी केली. जिथे मराठ्यांचे निवडून येथील त्याच ठिकाणी उभे करायचे, पण त्याला काही जातीचे समीकरण जुळून यायला पाहिजे. काही ठिकाणी जो आपली भूमिका मांडेल जो आपल्याला लिहून, देणार त्याला विजयी करणार असेही त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या