Shiv Sena Uddhav Thackeray Candidates List : शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून (Shiv Sena Uddhav Thackeray Group) आज 65 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये काही ठिकाणी  नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. परांडा विधानसभा मतदारसंघातून (Paranda Assembly Election) ठाकरे गटानं निष्ठावंत शिवसैनिकाच्या मुलाला उमेदवारी दिली आहे. उद्धव ठाकरेंचे कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेल्या माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मुलगा रणजित पाटील (Ranjit Patil) यांना उमेदवारी दिली आहे. पण उमेदवारी यादी प्रसिद्ध करताना चुकून राहुल पाटील असे नाव देण्यात आले आहे. मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्याविरोधात ते मैदानात उतरवले आहेत. 


शरद पवार गटाकडून इच्छुक असलेल्या राहुल मोटेंचा पत्ता कट?


परांडा विधानसभा मतदारसंघातील आमदार तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. गेल्या वेळेस त्यांच्या विरोधात राहुल मोटे यांनी निवडणूक लढवली होती. मात्र ते पराभूत झाले होते. यावेळी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून राहुल मोटे हे इच्छुक होते. मात्र, महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाला सुटला आहे.  तीन टर्म आमदार राहिलेल्या राहुल मोटेंचा पत्ता यावेळेस कट झाला आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंचे कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेल्या माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मुलाला शिवसेनेकडून उमेदवारी दिली आहे.


शिवसेना युबीटी पक्षाकडून अधिकृत 65 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी, 40 पेक्षा जास्त उमेदवारांना शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत. तर, आता उर्वरीत बहुतांश मतदारसंघात उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.  त्यामध्ये, आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या उमेदवारी यादीत 65 जणांना तिकीट देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील 13 मतदारसंघातील उमेदवार शिवसेना ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आले आहेत. शिवसेना ठाकरे गटाने 15 पैकी 14 आमदारांना पुन्हा एकदा पहिल्या यादीमध्ये स्थान दिलं आहे. मात्र, शिवडी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अजय चौधरी यांना अजूनही वेटिंगवर ठेवलं आहे. त्यामुळे शिवडी विधानसभा मतदारसंघात अजय चौधरी की सुधीर साळवी हा सस्पेन्स अजूनही कायम आहे.


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी जाहीर, ठाकरेंचे 65 उमेदवार रणांगणात!