Jat Vidhan Sabha : सांगली जिल्ह्यामध्ये शिराळा मतदारसंघांमध्ये भाजपला सम्राट महाडिक यांची नाराजी दूर करण्यात यश आलं असलं, तरी जत विधानसभेला मात्र बंडखोरांची डोकेदुखी कायम आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तमनगौडा रवी पाटील यांची भेट घेऊन सुद्धा कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे पाटील अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्या यांच्यासमोर आव्हान ठाकलं आहे.


दुसरीकडे, कोणत्याही प्रकारे बंडखोर शांत होण्यास तयार नसल्याने आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जत विधानसभेला लक्ष घातलं आहे. गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीस यांची सभा जतमध्ये होणार आहे. 6 नोव्हेंबर रोजी जतमध्ये पडळकर यांच्यासाठी फडणवीस यांची सभा होईल. त्यामुळे बंडखोर थांबत नसल्याने या सभेमध्ये फडणवीस काय उत्तर देणार? याकडे लक्ष असेल. या मतदारसंघांमध्ये गोपीचंद पडळकर महायुतीचे उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे विक्रमसिंह सावंत रिंगणात आहेत. तमनगौडा पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे जत विधानसभेला तिरंगी लढत होत आहे. भूमिपुत्राचा उपस्थित मुद्दा उपस्थित करून भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह अनेक नेत्यांनी गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. 


सम्राट महाडिकांचं बंड मागे, सत्यजित देशमुखांना देणार पाठिंबा


दरम्यान, शिराळा मतदारसंघात सम्राट महाडिक यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी भरला होता. कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणूक लढवणारच अशी भूमिका त्यांनी घेतली होती. शिराळामधून भाजपकडून सत्यजित देशमुख यांना उमेदवारी जाहीर झाल्याने सम्राट महाडिक यांनी बंडखोरी करत अपक्ष भरला अर्ज भरला होता. मात्र, त्यांची बंडखोरी रोखण्यात भाजपला यश आलं आहे. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. ते सत्यजित देशमुख यांनी पाठिंबा देणार आहेत. शिराळामध्ये आता शरद पवार गटाचे मानसिंगराव नाईक विरुद्ध भाजप कडून सत्यजित देशमुख अशी होणार काट्याची लढत होणार आहे. दोन दिवसापूर्वी बंडखोरी केलेल्या महाडिक बंधूंसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उप मुख्यमंत्री यांनी वर्षा बंगल्यावर चर्चा केली होती. 


इतर महत्वाच्या बातम्या