जळगाव : तब्बल नऊ तासानंतर वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) रावेर येथील उमेदवार शमिभा पाटील (Shamibha Patil) यांचे आंदोलन अखेर थांबले आहे. रावेर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय शिरीष चौधरी (Dhananjay Chaudhari) यांना नोटीस जारी करण्यात आल्यानंतर त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. या नोटिशीत नोटीस मिळाल्यापासून 24 तासांच्या आत खुलासा अर्ज सादर करण्याची निवडणूक अधिकाऱ्यांनी चौधरी यांना सूचना दिली आहे. 


नेमकं प्रकरण काय आहे? 


निवडणूक अधिकाऱ्यांनी धनंजय चौधरी यांना दिलेल्या नोटिशीनुसार शमिभा भानुदास पाटील यांच्यातर्फे दिशा पिंकी शेख यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे एक तक्रार केली होती. या तक्रारीनुसार 12 नोव्हेंबर 2024 रोजी रावेर विधानसभा मतदारसंघाचे उेदवार धनंजय शिरीष चौधरी याच्या प्रचारार्थ फैजपूर येथे एक सभा घेण्यात आली होती. या सभेत राज्यसभा सदस्य इम्रान प्रतापगढ हे उपस्थित हेते. यावेळी मुकूंद सपकाळ यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने भाजपा पक्षाकडून पैसा घेतल्याचा आरोप केला. तसेच प्रचार यंत्रणा व गाड्या यासंबंधीही सामाजात संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे सामाजिक असुरक्षितता निर्माण झाल्याचा आरोप शमिभा पाटील यांनी केला होता. 






धनंजय चौधरी यांना 24 तासांच्या आत स्पष्टीकरण द्यावे लागणार


याच तक्रारीवर कारवाई करावाई यासाठी शमिभा पाटील यांनी 16 नोव्हेंबर रोजी आंदोलन पुकारले होते. धनंजय चौधरी जोपर्यंत माफी मागत नाहीत किंवा खुलासा करत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका शमिभा पाटील तसेच वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा दिशा पिंकी शेख यांनी घेतली होती. याच आंदोलनाची दखल घेत निवडणूक अधिकाऱ्याने धनंजय चौधरी यांना नोटीस दिली आहे. या नोटिशीनुसार धनंजय चौधरी यांना 24 तासांच्या आत स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. 



20 तारखेला मतदान, 23 तारखेला निकाल 


दरम्यान, 18 नोव्हेंबर हा प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर 23 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे.  


हेही वाचा :


Sharad Pawar Speech: शरद पवार 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'लाडकी बहीण'चं नरेटिव्ह कसं कापतायत? भाषणांमधील दोन फॅक्टर्सची जोरदार चर्चा


Prakash Ambedkar : मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध ही भूमिका भाजपनं घ्यावी, प्रकाश आंबेडकर यांचं थेट आव्हान


Sujat Ambedkar: ...तर राज ठाकरे यांचा भोंगा उतरवण्याचं काम सर्वात आधी वंचित बहुजन आघाडी करेल; सुजात आंबेडकरांचं थेट इशारा