पुणे: 2019च्या विधानसभेला एबी फॉर्म हाती असताना ही उमेदवारीनं हुलकावणी दिलेल्या शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली. पण 2019ची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचं आव्हान त्यांच्या समोर असेल. तेव्हा अजित पवारांनी शिलवंतांना एबी फॉर्म दिला खरा पण त्यांच्याआधी अण्णा बनसोडेंना अर्ज दाखल करायला लावले. त्याचीच पुनरावृत्ती यंदा होईल का? अशी चर्चा शहरात रंगलेली आहे. त्यामुळं शिलवंतांना सर्वात आधी एबी फॉर्म वेळेत दाखल करावं लागेल, त्यानंतर मविआतील ठाकरे गटाचे बंड थंड करावे लागेल. त्यानंतर 2019ला त्यांचं एबी फॉर्म हिसकावून घेणाऱ्या अण्णा बनसोडेंशी सामना करावा लागेल.


2019 ची पुनरावृत्ती होणार?


2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पक्षाकडून सुलक्षणा शिलवंत यांना अधिकृत एबी फॉर्मही दिला होता. मात्र, त्यांनी अर्ज भरण्यापूर्वीच शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी खेळी केली. रात्रीतून अण्णा बनसोडे यांच्या नावाचा पक्षाकडून एबी फॉर्म आणून त्यांचा ऐनवेळी उमेदवारी अर्ज भरण्यात आला. त्यामुळे सुलक्षणा शिलवंतांचा पत्ता कट झाला. त्याचप्रमाणे यावेळीही 2019 ची पुनरावृत्ती करण्याचा डाव शहर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात शिजत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा धास्ती निर्माण झाली आहे.


एबी फॉर्म असून देखील राष्ट्रवादीच्या सुलक्षणा शिलवंत यांचा अर्ज बाद झाला होता. घटना आज पिंपरी राखीव मतदारसंघात घडली होती. त्यामुळे त्याची आता देखील मोठी चर्चा होत आहे.चपळाई दाखवत माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी सुलक्षणा शिलवंत यांच्या अगोदर एबी फाॅर्मसह उमेदवारी अर्ज  दाखल केल्याने तो वैध ठरवण्यात आला.