Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024  : विधानसभेत संख्याबळ नसतानाही विधानपरिषद निवडणूक जिंकण्याचा करिष्मा असणारे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणूक यावेळी पराभव झाला. 11 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. शेकपच्या जयंत पाटलांना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पाठिंबा देण्यात आला होता. पण जयंत पाटील यांना अपेक्षित मतेच मिळाली नाही. जंयत पाटील यांना पहिल्या पसंतीची फक्त 8 मते मिळाली. तर जयंत पाटलांच्या एकूण मतांची संख्या फक्त 12 इतकीच राहिली. पराभवानंतर जयंत पाटील संतप्त झाले होते. त्यांनी मतमोजणी सुरु असतानाचा काढता पाय घेतला. एकूण संख्याबळ पाहता महायुतीचे 9 आणि मविआचे दोन उमेदवार निवडून येतील, असाच अंदाज होता. पण ऐनवेळी उद्धव ठाकरेंकडून मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे चुरस वाढली. निकालानंतर मविआचे जंयत पाटील यांनाच पराभवाचा सामना करावा लागला. जंयत पाटील यांचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत.  शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनीच जयंत पाटलांचा पराभव केला, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून येत आहे. लोकसभा निवडणुकीत मावळ आणि रायगडमध्ये झालेल्या पराभवाचा वचपा ठाकरेंनी काढल्याचा एक वेगळा सुरु उमटत आहे. 


रायगड आणि मावळ मतदारसंघात जयंत पाटील यांची ताकद आहे. पण त्यांच्याकडून अपेक्षित मदत मविआला झाली नाही, त्यामुळेच ठाकरे आणि पवार यांनी जयंत पाटील यांचा पराभव करत वचपा काढल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहे. वेळेवर उबाठा गटाने दोस्तीत कुस्ती केली, गद्दारी केली आणि मिलिंद नार्वेकरांला उभं केलं शेवटी व्हायचं ते झालं, अशी प्रतिक्रिया एका नेटकऱ्यांनी दिली आहे.


जयंत पाटलांचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. पाहूयात, कोण काय काय म्हणाले... 


























































माझी 12 मतं मला मिळाली पण.... जयंत पाटील पराभवानंतर काय म्हणाले?


विधानपरिषदेत पराभव झाल्यानंतर जयंत पाटील तडकाफडकी अलिबागसाठी रवाना झाले. एबीपी माझाने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी फार बोलण्यास नकार दिला. "माझी बारा मते मला मिळाली. काँग्रेसची मते त्यांना मिळाली. काँग्रेसची काही मते फुटली. जाऊदे आता नको बोलायला. ", एवढीच माफक प्रतिक्रिया त्यांनी दिली.