Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध करण्याच्या महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना अपयश आले. त्यामुळे आता राज्यसभेसाठी निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झालेय. राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाकडून परस्परांना उमेदवार मागे घेण्यासाठी ऑफर देण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत कोणीही अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे आता राज्यसभेची निवडणूक अटळ आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. राज्यसभा निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून महाविकास आघाडी सरकारने मोठा निर्णय घेतलाय.
सुत्रांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीने आपल्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये एकत्र ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 10 जून रोजी राज्यसभेसाठी मदतान होणार आहे. त्याआधी दोन दिवस सर्व आमदारांना मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये एकत्र ठेवणार आहेत.
राज्यसभा निवडणुकीसाठी येत्या 10 जून रोजी विधान भवनात मतदान होणार आहे. त्यापूर्वी कोणताही दगा फटका होऊ नये यासाठी सर्व आमदारांना आठ जून रोजी मुंबईत दाखल होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबई येणाऱ्या सर्व आमदारांना ट्रायडंट हाँटेलमध्ये रहाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचं सुत्रांनी सांगितलेय. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपकडून आमदारांची फोडा फोडी होऊ शकते, त्यासाठी आतापासूनच रणनिती आखल्याची माहीती सूत्रांनी दिलीय.
महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल 18 वर्षानंतर राज्य सभेची निवडणूक होत आहे. निवडणूक टाळण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न करण्यात आले. पण त्यांना अपयश आले. आता निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झालेय. या निवडणूकीत कोणताही दगा फटका होऊ नये, त्यामुळे महाविकास आघाडीने सर्व आमदारांना एकत्र हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय. शिवसेना 55 आमदार, काँग्रेस 44 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आमदार (अनिल देशमुख आणि नवाब मलिक वगळता), त्याशिवाय सपोर्ट करणारे काही आमदार... या सर्वांची हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधानसभा पक्षीय बलाबल
सत्ताधारी महाविकास आघाडीचं संख्याबळ
शिवसेना - 55
राष्ट्रवादी - 53
काँग्रेस - 44
बहुजन विकास आघाडी - 3
समाजवादी पार्टी - 2
प्रहार जनशक्ती पार्टी - 2
माकप - 1
शेकाप - 1
स्वाभिमानी पक्ष - 1
क्रांतिकारी शेतकरी पार्टी - 1
अपक्ष - 9
सत्ताधाऱ्यांकडे एकूण संख्याबळ - 172
......................
विरोधी पक्ष भाजपकडील संख्याबळ
भाजप - 106
जनसुराज्य शक्ती - 1
राष्ट्रीय समाज पक्ष - 1
अपक्ष - 4
विरोधाकडे असलेले एकूण संख्याबळ - 112
तर महत्वाच्या बातम्या
Rajya Sabha Election: भाजपनं पैसा वाया घालवू नये, सामाजिक कार्यात वापरावा, चटक लावू नये- संजय राऊत
राज्यसभा निवडणुकीचा धुरळा; आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी भाजप, मविआ लागले कामाला
Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची घोडे कुठे अडले?'