मुंबई: राज्यातील 238 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे आज निकाल लागले. त्यामध्ये काही ठिकाणी समिश्र निकाल लागले तर काही ठिकाणी पक्षांना निर्विवाद यश मिळाले. राज्य निवडणूक आयोगाने 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची जून महिन्यात घोषणा केली होती. त्यातील 33 ग्रामपंचायतींच्या निवडणुका पूर्णत: तर काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका अशंत: बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी प्रत्यक्षात 238 ग्रामपंचायतींसाठी मतदान झालं होतं. 


पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील तांदळी ग्रामपंचायतीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मच्छिंद्र गदादे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे  सुभाष कळसकर यांनी 10 विरुद्ध 1 अशा फरकाने विजय मिळवला.  त्यांनी भाजपच्या पॅनेलचा एकतर्फी पराभव केला. पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील लोणीकंद ग्रामपंचायतीवर भाजपच्या प्रदीप कंद यांनी 17 विरुद्ध 0 शुन्य असा एकतर्फी विजय मिळवलाय.  राष्ट्रवादीचे शिरूर विधानसभा मतदारसंघातील आमदार अशोक पवार यांच्यासाठी हा धक्का आहे.


सोलापूरमध्ये भाजपचं वर्चस्व
सोलापूर जिल्ह्यात एकूण 25 ग्रामपंचायतीचे निकाल हाती आलेत. यामध्ये भाजपने मुसंडी मारत 9 ग्रामपंचायतीवर झेंडा फडकवाला आहे. तर सत्तेत सहभागी झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या समर्थक गटाला केवळ 1 जागावर समाधान मानवं लागलं. मात्र उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांनी आपला करिष्मा कायम ठेवत 4 ग्रामपंचायती आपल्या ताब्यात मिळवल्यात. या निवडणुकात जनतेने 7 ठिकाणी स्थानिक आघाडीकडे आपल्या ग्रामपंचायतिचा कारभार हाती दिलाय. काँग्रेसचा गड राहिलेल्या सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाल्याचे चित्र आहे.


उस्मानाबाद जिल्हा ग्रामपंचायतीचा निकाल 


तुळजापूर तालुका
कामठा - सर्वपक्षीय विजयी, भाजप पराभूत
दिपकनगर - स्थानिक आघाडी विजयी 


उमरगा तालुका
तुगांव - शिवसेना विजयी - काँग्रेस पराभूत 
अंबरनगर - बिनविरोध 
कोरेगाव - शिवसेना 
कोरेगाववाडी - शिवसेना विजयी - काँग्रेस पराभूत 
कसगी - शिवसेना विजयी - काँग्रेस पराभूत 


लोहारा तालुका
चिंचोली - स्थानिक आघाडी विजयी 
खेड - स्थानिक आघाडी विजयी


कळंब तालुका
दाभा - भाजप विजयी - महाविकास आघाडी पराभूत 


वाशी तालुका
सोनेगाव - शिंदे गट विजयी - भाजप पराभूत


जिल्हा- उस्मानाबाद 
एकुण ग्रामपंचायत- 11
शिवसेना- 04
भाजप- 01
शिंदे गट- 01
राष्ट्रवादी-
काँग्रेस- 
इतर - 05 ( स्थानिक आघाडी )



बीड जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीची सरशी


बीड जिल्ह्यातील एकूण 13 ग्रामपंचायतीसाठी आज मतमोजणी झाली. त्यात सहा ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस, चार ठिकाणी भाजप, शिवसेना दोन तर एका ठिकाणी संमिश्र राजकीय पक्षांचा विजय झाला आहे. अंबाजोगाई तालुक्यात सर्वाधिक म्हणजे पाच ग्राम ग्रामपंचायतीसाठी निवडणुका झाल्या. यात चनई, श्रीपतरायवाडी आणि दगडवाडी या ठिकाणी भाजप पुरस्कृत पॅनल निवडून आला. तर, लोखंडी सारगाव आणि मोरेवाडी या ग्राम पंचायती राष्ट्रवादी कॉंग्रसच्या ताब्यात गेल्या आहेत. गेवराई तालुक्यात पाच ग्राम पंचायतींची निवडणूक झाली. यात राष्ट्रवादीचा चार ठिकाणी विजय झाला तर एका ठिकाणी भाजपचा विजयी झाला. सिरसमार्ग, पाचेगाव, दिमाखवाडी आणि जयराम तांडा हे राष्ट्रादीच्या ताब्यात राहिले. तर, वसंतनगर तांडा ही ग्राम पंचायत भाजपच्या ताब्यात गेली. 


बीड तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीसाठी मतमोजणी झाली. त्यात दोन ग्राम पंचायती शिवसेनेच्या ताब्यात तर एका ग्राम पंचायतीत संमिश्र राजकीय पक्षांना यश मिळाले. यात अंथरवन पिंपरी व अंथरवन पिंपरी तांडा या शिवसेनेच्या ताब्यात तर गवळवाडी ग्राम पंचायतमध्ये संमिश्र राजकीय पक्षांना यश मिळाले.


औरंगाबादमध्ये शिंदे गटाचे वर्चस्व
औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाने  वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्ह्यातील 15 ग्रामपंचायतींपैकी तब्बल 12 ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने वर्चस्व मिळवले आहे. कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या शिवसेनेला 15 पैकी केवळ एका ग्रामपंचायतमध्ये यश मिळालं आहे. काँग्रेसला एकही ग्रामपंचायत मिळाली नाही. तर भाजपला एका ठिकाणी यश मिळालं. राष्ट्रवादीला एक ग्रामपंचायत मिळवण्यात यश आले आहे.  त्यामुळे औरंगाबादच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला पाहायला मिळतो आहे.


बुलढाणा जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायत चे निकाल


खामगाव तालुका - 
1 - खामगाव ग्रामीण. - भाजपा पॅनल (एकूण सात - भाजपा 05 , काँग्रेस 02 )
2 - पिंप्री धनगर. - काँग्रेस पॅनल ( एकूण सात जागा - काँग्रेस 06 , अपक्ष - 01 )


मलकापूर तालुका -
1- उमाळी. - काँग्रेस (एकूण 11 जागा , काँग्रेस 7 , स्थानिक पॅनल - 4 )
2- बेलाड - स्थानिक पॅनल ( एकूण जागा - 08 )
3- आळंद - स्थानिक पॅनल


परभणी जिल्ह्यातील 3 ग्रामपंचायतचा निकाल


तिन्ही ग्रामपंचायत सेलू तालुक्यातील होत्या.


राजवाडी :- भाजप पुरस्कृत पॅनल विजयी, राष्ट्रवादी पराभूत
डुगरा ब्राम्हणगाव :-  राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल विजयी 
कवडधन :-बिनविरोध राष्ट्रवादी गटाकडे


लातूर जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायत 786 आहेत. त्यापैकी 9 ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक होती. त्यापैकी तीन ग्रामपंचायत बिनविरोध आल्या आहेत. तर सात ग्रामपंचयतीसाठी मतमोजणी झाली आहे 


रेणापूर तालुक्यातील 
रामवाडी खरोळ - (भाजपा )
रामवाडी पानगाव- (बिनविरोध मनसे )
नरवटवाडी- (भाजपा )
पानगांव- (सर्व पक्षीय पानगाव विकास आघाडी )


शिरुर अनंतपाळ तालुक्यातील 
नागेवाडी, (सर्व पक्षीय गावपातळीवर )
आनंदवाडी, (शिवसेना प्रणित)
तुरुकवाडी. ( राष्ट्रवादी काँग्रेस)
हनुमंत वाडी ( बिनविरोध भाजपा.)


देवणी तालुक्यातील 
दरेवाडी ( बिनविरोध )


जळगावमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीची बाजी
रावेर तालुक्यातील आदिवासी पट्ट्यातील 12 ग्रामपंचायतचा सर्व निकाल लागला. 10 यात ग्रामपंचायतवर काँग्रेस-राष्ट्रवादीने बाजी मारली. काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी यांचे वर्चस्व या ठिकाणी कायम राहिलं आहे. तर भाजपाच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार असल्यामुळे रक्षा खडसेंना या ठिकाणी मोठा धक्का मानला जात आहे.


सांगली जिल्ह्यातील किंदरवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता
सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील  किंदरवाडी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीने झेंडा फडकवत आपली सत्ता कायम ठेवलीय. राष्ट्रवादीच्या पॅनल मधील 7 पैकी 7 ही उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादीचे तालुक्यातील युवा नेते रोहित पाटील यांनी किंदरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवाराची भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. किंदरवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी विरोधात पॅनल उभा केलेल्या भाजपला या निवडणुकीत  काहीही यश मिळाले नाही. या निवडणुकीत  राष्ट्रवादीचे  युवा नेते रोहित आर आर पाटील याचे पॅनल  विरुद्ध भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या पॅनल मध्ये  सरळ लढत होती.  या निवडणुकीत दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली  होती. मात्र यात रोहित पाटील यांनी बाजी मारली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित आर आर पाटील यांच्या पॅनल च्या 7 पैकी 7 ही  उमेदवार निवडून आले.