Maharashtra Elections Results 2026 : लोकशाहीच्याउत्सवातअर्थातकुठल्याहीमतदानात एका मताची किंमत काय असते. याचा प्रत्यय परभणी येथे आलाय. परभणी महापालिकेतील प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेनाउद्धवठाकरेगटाचे उमेदवार (Uddhav Thackeray Shivsena) व्यंकट डहाळे अवघ्या 1 मताने विजयी झालेआहे. तर भाजपचे उमेदवार प्रसाद नागरे यांचा अवघ्या 1 मताने पराभव झालाय. मतमोजणीच्यादिवशी याच एका मताच्या फरकामुळे जवळपास 3 तास वाद सुरू होता. अखेर निवडणूक निरीक्षक मेघना कावली यांनी सर्व बाबी जाणून घेत उबाठा गटाचे उमेदवार व्यंकट डहाळे यांचा विजय जाहीर केलाय. मात्रयानिमित्यानेएका मताचीकिंमतएका उमदेवराचेभवितव्यठरवणारेठरलंअसूनयाविजयाचीआताराज्यातचर्चाआहे.
Parbhani Elections Results 2026 : ठाकरेगटाचे उमेदवार व्यंकट डहाळे अवघ्या 1 मताने विजयी
परभणी शहरातील प्रभाग क्रमांक एक मधील एका जागेवरून भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मतमोजणीवरून मोठावादझालाहोता. परभणीच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये अवघ्या 1 मताने उद्धव ठाकरे शिवसेना उमेदवार व्यंकट डहाळे पोस्टल मतात विजयी झालेआहे. याएकमताच्याफरकावर भाजपने आक्षेप घेत पुन्हा पोस्टल मतांची मोजणी सुरुकरायलालावली. याचमतमोजणीवरून 16 जानेवारीला भाजप आणि ठाकरेंच्या सेनेत मोठा वाद झाला. यावेळी उबाठाचे खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील हे देखील मतमोजणी केंद्रामध्ये दाखल झालेहोते. अखेर 3 तासांच्यामतमोजणीआणिवादाच्यापार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक मेघना कावली यांनी सर्व बाबी जाणून घेत उबाठा गटाचे उमेदवार व्यंकट डहाळे यांचा विजय जाहीर केला.
Gadchiroli Elections Results 2026: भाजप उमेदवाराचाअवघ्या 1 मताने धक्कादायक पराभव, काँग्रेसचे श्रीकांत देशमुख विजयी
असाचकाहीसाप्रकार, गडचिरोली येथे देखीलबघायला मिळालाय. काँग्रेसचे प्रभाग 4 ब मधील श्रीकांत देशमुख यांनी भाजपचे संजय मांडवगडे यांचा एका मताने धक्कादायक पराभव केलाय. या अटीतटीच्या लढतीत श्रीकांत देशमुख यांना 717 मते मिळाली, संजय मांडवगडे यांना 716 मतांवर समाधान मानावे लागले. अवघ्या एका मताने विजय हुकल्याने भाजप गोटात शांतता पसरली, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पराभूत उमेदवार मांडवगडे यांनी निकालावर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व प्रक्रिया कायदेशीर असल्याचे स्पष्ट करत निकाल जाहीर केला.
आणखी वाचा
