Dharashiv Operation Lotus : नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजपला (BJP) घवघवीत यश मिळालंय. मात्र त्यानंतरही भाजपकडून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ऑपरेशन कमळ (Operation Lotus) सुरूच आहे. भाजपच्या ऑपरेशन कमळचा सर्वाधिक फटका शिवसेना ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) बसतोय. खासदार ओमराजे निंबाळकर (Omprakash Rajenimbalkar) यांना झटका देत आमदार राणाजगजीतसिंह पाटील (Ranajagjitsinha Patil) यांनी शिवसेनेतील अनेक नेत्यांना भाजपात प्रवेश दिलाय. नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर जवळपास आठ ते दहा पक्षप्रवेश ठाकरे गटातून भाजपमध्ये झाले आहे.निवडणुकीतील यशानंतरही भाजपकडून ऑपरेशन कमळ सुरूच, ठाकरे सेनेचे पदाधिकारी भाजपच्या गळाला
दरम्यान, भाजपच्या ऑपरेशन कमळचा सर्वाधिक फटका हा ठाकरेंच्या शिवसेनेला बसतोय. खासदार ओमराजे निंबाळकर यांना आमदार राणाजगजितसिंह पाटील पिता पुत्राकडून निवडणुकीच्या तोंडावर हा झटका देण्यात आला असून जिल्ह्यातील अनेक गावातील प्रमुख कार्यकर्ते भाजपात पक्ष प्रवेश करत आहे. यात सांजा, कनगरा, रामवाडी, गावसुद, बेंबळी, धारूर , तामलवाडी अशा विविध गावातील ठाकरे सेनेचे पदाधिकारी भाजपच्या गळाला लागले आहे.
बुलढाण्यात भाजपाला शिंदे सेनेचा धक्का, जिल्हा सरचिटणीससह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदेसेनेत प्रवेश
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस व विदर्भातील बजरंग दलाचे समन्वयक अमोल अंधारे यांच्यासह भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. आगामी जिल्हा परिषद निवडणूक बघता जिल्हाभरात भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
Vishwas Abaji Patil: गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील यांचा अखेर शिवसेनेत प्रवेश
गोकुळचे माजी चेअरमन विश्वास आबाजी पाटील यांनी अखेर शिवसेनेत प्रवेशकेलाआहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत दाखलझालेआहे. विश्वास आबाजी पाटील यांच्या सेना प्रवेशामुळे गोकुळमध्ये आताबदलहोणारका? असाप्रश्नहीयानिमित्यानेआताचर्चेतआलाआहे. अशातच गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणारआहे.
विश्वास पाटील यांची करवीर तालुक्यात दूध संस्थांच्या माध्यमातून ताकद आहे. 40 वर्षांहून अधिक काळ ते सक्रिय राजकारणात असल्याने त्यांचा प्रत्येक गावात कमी-अधिक प्रमाणात गट आहे. त्यामुळे स्वर्गीय आमदार राहुल पाटील यांनी काँग्रेस सोडल्यानंतर तालुक्यातील काँग्रेसची जबाबदारी पाटील यांनी घ्यावी, असा आग्रह आमदार सतेज पाटील यांचा हाेता. पण, त्यांनी सावध भूमिका घेत आपले पत्ते खुले केले नव्हते. अशातचआत गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणारआहे.
आणखी वाचा
